Bihar Road Accident: साम टीव्ही
देश विदेश

Accident: सकाळी-सकाळी भयंकर अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू; ४ जणांची प्रकृती चिंताजनक

Bihar Road Accident: बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पिओची भीषण धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीच्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

गुणसागर गावाजवळ भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी लखीसराय येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी झारखंडहून येत होते. ते मूळचे मोतिहारी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ मोतिहारीहून देवघरकडे जात होती. गुणासागरजवळ स्कॉर्पिओची समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकशी धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की स्कॉर्पिओमधील ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी गोंधळाचे वातावरण होते. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सर्व मृत आणि जखमींना लखीसराय येथील रुग्णालयात आणण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला केली अन् वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे कारण शोधण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहेत.

अपघात झालेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये मुंडन विधीशी संबंधित साहित्यही आढळले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मुंडन विधी करण्यासाठी देवघरला कुटुंब जात असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.पण याला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांकडून जखमींचा जबाब नोंदवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्याला दुष्काळाच्या झळा

Vangyache Bharit Recipe : चुलीवर भाजलेल्या वांग्याचा खास स्वाद! हिवाळ्यात बनवा कोकण स्पेशल झणझणीत वांग्याचे भरीत

मुंबईकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर! अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत; वाचा कधीपासून सुरू होणार नवा मार्ग?

Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर पालिकेकडून हातोडा, सहाव्या दिवशी कारवाई सुरूच; नामांकित हॉटेल्सना दणका

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे गड, भव्यता पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT