Nitish Kumar Rajya Sabha : Saam TV Marathi
देश विदेश

ठरलं! बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलणार, नीतीश कुमार केंद्रात जाणार, केंद्रात मोठ्या घडामोडी

Nitish Kumar Rajya Sabha : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत केंद्रात जाणार असल्याचे स्पष्ट झाले. बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Nitish Kumar Rajya Sabha nomination news : बिहारमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. कारण मुख्यमंत्री नीतीश कुमार केंद्रात जाणार (Nitish Kumar moving to central politics) असल्याचे आता निश्चित आहे. नीतीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नीतीश कुमार केंद्रात जाणार असल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद (who will be next Bihar chief minister after Nitish Kumar,) बदलणार आहे. बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदी (Bihar next chief ministe) भाजप की जेडीयूचा नेता बसणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये नितीश कुमार यांचा मुलगा मुख्यमंत्री होणार असल्याचे काही जणांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, भाजप बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बसवू शकतो. (Nitish Kumar to File Rajya Sabha Nomination Will BJP or RJD Get the bihar Chief Minister Post)

नीतीश कुमार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नीतीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. हा निर्णय नितीश कुमारांचा नाही, ही गद्दारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह नितीश कुमार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दुपारी १२ वाजता अमित शाह यांच्या उपस्थित नीतीश कुमार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नीतीश कुमार नेमकं काय म्हणाले ?

मागील २ दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर तुमचा विश्वास आणि पाठिंबा सातत्याने कायम ठेवला आहे. त्याच जोरावर आम्ही बिहारची व तुम्हा सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याचीच ही ताकद होती. त्यामुळे बिहार आज विकास आणि सन्मानाचा एक नवीन आयाम सादर करत आहे. यासाठी मी यापूर्वीही अनेकदा तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. संसदीय जीवन सुरू केल्यापासूनच माझ्या मनात एक इच्छा होती की, मी बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसोबतच संसदेच्या दोन्ही सभागृहांचाही सदस्य व्हावे. याच अनुषंगाने यावेळी होत असलेल्या निवडणुकीत मी राज्यसभेचा सदस्य होऊ इच्छितो.तुमच्यासोबतचे माझे हे नाते भविष्यातही असेच टिकून राहील, याचा विश्वास मला आहे. तुमच्या सोबतीने एक विकसित बिहार घडवण्याचा आमचा संकल्प पूर्वीप्रमाणेच कायम राहील. नवीन सरकार स्थापन होईल, त्यांना माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट, ८ दिवसात खात्यात ₹२००० येणार?

Maharashtra Live News Update : व्हीएसआर कंपनीचे वी. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू

Kolhapur : वाहन सर्व्हिसिंग मशीनने बैल धुणं पडलं महागात; कोल्हापुरात शॉक लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

How To Remove Facial Hair: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी घरी कोणता उपाय करायचा?

Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे,आताच आहारात समावेश करा

SCROLL FOR NEXT