Shocking Crime in Patna Saam Tv News
देश विदेश

भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले

Bihar Patna Crime news: बिहारची राजधानी पाटणा येथे एका अल्पवयीन मुलीची धावत्या चारचाकीत बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीला बेड्या ठोकण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

  • महागड्या चारचाकीत अल्पवयीन मुलीचे लचके तोडले

  • सोशल मीडियात झाली होती ओळख

  • बिहारच्या पाटणा येथील धक्कादायक घटना

बिहारची राजधानी पाटणा येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चालत्या स्कॉर्पियोमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. तरूणाने हे भयंकर कृत्य केलं आहे. त्यानंतर आरोपीनं मुलीला घरासमोर सोडून पळ काढला आहे. पीडितेनं या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

शिकेश कुमार असे आरोपीचे नाव आहे. तो खजुरार गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर, पीडित अल्पवयीन मुलगी १४ वर्षांची असल्याची माहिती आहे. पीडित तरूणी भदौर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आणि आरोपी तरूण काही महिन्यांपासून मोबाईल फोनद्वारे संवाद साधत होते.

सोशल मीडियात दोघांमध्ये चॅटिंग सुरू होती. हळूहळू त्यांचे नाते मैत्रीत रूपांतरित झाले. रविवारी आरोपीनं पीडित तरूणीला फोन केला. नंतर तिला स्कॉर्पिओमधून फिरवण्याच्या बहाण्याने नालंदाच्या बिंद पोलीस स्टेशन परिसरात घेऊन गेला. आरोपीनं चालत्या स्कॉर्पिओमध्ये तरूणीसोबत बलात्कार केला.

या घटनेनंतर आरोपीनं पीडित तरूणीला घराजवळ सोडलं. तसेच पळून गेला. पीडितेनं याची माहिती कुटुंबियांना दिली. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा तपास करून बेड्या ठोकण्यात आला आहे. चौकशीनंतर त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं आहे'. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

Cabbage Recipe : कोबीची भाजी आवडत नाही, मग झटपट बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Aho Meaning: लग्नानंतर बायको "अहो" का म्हणते? शब्दाचा अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

Pune News: पुण्यात कडाक्याची थंडी; पण शेकोटीला बंदी, महापालिकेचा अजब निर्णय

SCROLL FOR NEXT