Shocking Crime Saam TV News
देश विदेश

Shocking: शिवमंदिरात पुजाऱ्याची भयानक हत्या; रक्ताने माखलेला मृतदेह पाहून भक्त भयभयीत, गावात खळबळ

Priest Brutally killed news: मोतिहारी जिल्ह्यातील चापा गावातील शिवमंदिरात पुजाऱ्याची निर्घृण हत्या झाली. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील चापा गावातील शिवमंदिरात पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना पिपरा पोलीस ठाणे परिसरातून उघडकीस आली. शिवमंदिरात पुजाऱ्याचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळला. मृत पुजारी पिपरा ठाणे परिसरातील चापा गावचा रहिवासी असून, जमिनीवरून पुजाऱ्याची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरि गिरी असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री पुजारी हरि गिरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात झोपायला गेले होते. रात्री उशीरा त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सकाळी ग्रामस्थ पूजा करण्यासाठी गेले असता, गावकऱ्यांना पुजारीचा मृतदेह आढळला. रक्ताने माखलेला मृतदेह पाहून अनेकांनी किंकाळी फोडत मंदिराबाहेर धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी गर्दी जमली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.

तपासासाठी पोलिसांसोबत श्वान पथक आणि एफएसएल पथकालाही पाचारण करण्यात आले. एसएचओ अनुज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून पुजाऱ्याचे आरोपींशी वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जमीन सोडून जा, नाहीतर मारून टाकेन, अशी धमकी दिली होती. आरोपींनी नंतर धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांची हत्या केली.

पुजाऱ्याच्या कुटुंबाने ३ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी ३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापैकी दोन तरूणांना पोलिसांनी चौकशी करून अटक केली आहे. राहुल आणि अनिल अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तपास करून पुजाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागणार, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT