Veg Momos
Veg Momos Saam Tv
देश विदेश

Bihar News: खळबळजनक! कुटुंबाने त्याला मृत समजलं; तो शेजारच्या राज्यात मोमोज खाताना सापडला

Vishal Gangurde

Bihar News: बिहारमधील धक्कादायक घटनेची प्रचंड चर्चा होत आहे. कुटुंब, नातेवाईक ज्या तरुणाला मृत समजत होतं, तो शेजारच्या राज्यात मोमोज खाताना सापडल्यानं एकच खळबळ उडाली. बिहारमधील निशांत कुमार सोबत ही घटना घडली. तो दिवस होता ३१ जानेवारी २०२३. निशांत त्याच्या सासरवाडीतून गायब झाला होता. (Latest Marathi News)

गायब होण्याचं कारण कुणालाच कळू शकलं नाही. कुठेच तो सापडला नाही. त्यामुळे घरातले समजले की तो आता या जगातच नसावा.. घरातल्यांनी आशा सोडली. आता निशांत जिवंत नाही, अशी समजूत त्यांनी स्वतःला मनाला घालून घेतली.. कारण 4 महिने त्याचा कुठे काही पत्ता लागला नव्हता. पण निशांतचा मेहुणा रवीशंकरनं सुलतानगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

'बिचारा गरीब दिसतोय...'

निशांतच्या वडिलांनी त्यांचे व्याही आणि त्यांच्या मुलावर अपहरणाचा आरोप केला होता. चार महिने उलटूनही निशांतचा शोध लागला नव्हता. कुटुंबियांनी बराच शोध घेतला. मात्र त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी आशा सोडली. आणि त्याचा मृत्यू झाला असावा, असं कुटुंबाला वाटलं.

यानंतर निशांतचा मेहुणा रविशंकर सिंह नोएडाला गेला. यावेळी योगायोगानं रविशंकर नोएडाच्या एका मोमोजच्या दुकानात गेला. भिकाऱ्यासारखे कपडे घातलेल्या, दाढी-मिशी वाढलेल्या एका व्यक्तीला दुकानदार तिथून पळवून लावत असल्याचं त्यानं पाहिलं. त्याला पाहून रविशंकरला दया आली. 'बिचारा गरीब दिसतोय. त्याला मोमोज खायला द्या. त्याचे पैसे मी देईन,' असं रविशंकरनं दुकानदाराला सांगितलं.

चार महिन्यांपूर्वी निशांत झाला बेपत्ता

भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची रविशंकरनं चौकशी केली. त्याला नाव विचारलं. त्याचं नाव ऐकताच रविशंकरच्या पायाखालची जमीनच सरकली. रविशंकर ज्याला भिकारी समजत होता.. तो तर निशांतच असल्याचं समोर आलं आणि क्षणभर त्यालाही विश्वास बसेनासा झाला... ज्या बहिणीचा नवरा आता जिवंतच नाही.. असं घरातले समजत होतो.. त्याला जिवंत पाहून रविशंकरच्या पायाखालची जमीनचच सरकली. कारण चार महिन्यांपूर्वी निशांत बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.

ज्या व्यक्तीमुळे दोन कुटुंबांत वाद झाले, प्रकरण पोलीसांपर्यंत गेलं, तो जिवंत असल्याचं पाहून दोन्ही कुटुंबांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसलाय.

दिल्लीला कसा पोहोचला?

अखेर रविशंकर यांनी पोलिसांना फोन करुन निशांत जिवंत असल्याची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनीही तातडीनं कारवाई केली. निशांतला ताब्यात घेतलं. नंतर बिहार पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण तो बेपत्ता कसा झाला, दिल्लीला कसा पोहोचला, याचं गूढ मात्र कायम आहे.

निशांत अज्ञातवासात कुणामुळे गेला? बेपत्ता का झाला? सगळे संबंध तोडून भलत्याच ठिकाणी का राहत होता? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT