देश विदेश

Largest Railway Accident : रेल्वे अपघातात 800 जणांनी गमावले होते प्राण, 42 वर्षांपूर्वीचा आजवरचा सर्वात मोठा अपघात; नेमकं काय घडलं होतं?

साम टिव्ही ब्युरो

Railway Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 238 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर शेकडो जण जखमी आहेत. कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात भीषण अपघात झाला. आजवर घडलेल्या मोठ्या रेल्वे अपघातांपैकी हा एक अपघात आहे.

आजच्या अपघातानंतर 42 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताच्या कटू आठवणी जागा झाल्या. बिहारमध्ये 1981 साली असाच एक रेल्वे अपघात झाला होता. रेल्वेचा हा आजवरचा सर्वात मोठा अपघात मानला जातो.

मानसीहून सहरसाकडे जात असलेली ट्रेन 6 जून 1981 साली बागमती नदीत कोसळली होती. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये एकूण 9 डब्बे होते. या अपघातात 800 जणांचा मृत्यू झाला होता. (latest Marathi News)

मोटरमनने ब्रेक लावला

ट्रेन बागमती नदीवरुन जात असताना 51 नंबरच्या पुलाजवळ भरधाव ट्रेनच्या मोटरमनने अचानक ब्रेक लावला. त्यानंतर पॅसेंजर ट्रेनचे 9 डब्बे पुलावरून बागमती नदीत कोसळले. त्यावेळी 800 प्रवाशांना बागमती जलसमाधी मिळाली. (Railway Accident)

सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार या अपघातातील मृतांची संख्या 300 होती. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात सुमारे 800 प्रवाशांनी जीव गमावला होता. अपघाताच्या कारणांचा शोध घेताना अनेक अंदाज वर्तवले गेले.

अपघाताचं कारण काय?

गाडी बागमती नदी ओलांडत असताना रुळावर गाई-म्हशींचा कळप समोर आला, त्यांना वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. याशिवाय हवामान खराब असल्याने जोरदार पाऊस पडत होता.

तसेच जोरदार वादळ देखील होते. त्यामुळे लोकांनी ट्रेनच्या सर्व खिडक्या बंद केल्या होत्या. जोरदार वादळामुळे सर्व दाब ट्रेनवर पडला आणि ट्रेन नदीत कोसळली. असे अनेक अंदाज या अपघाताबद्दल आजही वर्तवले जातात. मात्र चालकाने ब्रेक का लावला याचे कारण आजही समोर आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

SCROLL FOR NEXT