ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक दररोज पाणी पितात, परंतु बरेच लोक ते वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटलमध्ये ठेवून पिण्यास पसंत करतात.
बरेच लोक काचेच्या बॉटल वापरतात, तर बरेच लोक प्लास्टिक, स्टील, माती आणि फायबरच्या बॉटल वापरतात.
भारतातील बरेच लोक उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी तांब्याच्या बॉटल वापरतात.
आयुर्वेदानुसार, तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते, परंतु जर बॉटल दररोज स्वच्छ केले नाही तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
काच ही नैसर्गिक आणि रसायनमुक्त सामग्री आहे. त्यामुळे त्यातून कोणतेही हानिकारक घटक पाण्यात मिसळत नाहीत. काचेच्या बाटलीत पाणी ठेवल्यास त्याची नैसर्गिक चव कायम राहते.
प्लास्टिकच्या बॉटल पाण्यासाठी सर्वात हानिकारक मानल्या जातात. त्या पाण्यात अनेक प्रकारची रसायने मिसळतात.
स्टेनलेस स्टील बाटली प्लास्टिकप्रमाणे हानिकारक रसायने सोडत नाही. त्यामुळे ती शरीरासाठी सुरक्षित आहे.
मातीच्या बॉटलमधील पाणी हवेतून बाष्पीभवनामुळे थंड राहते. तसेच प्लास्टिक किंवा धातूंप्रमाणे कोणतेही केमिकल्स किंवा विषारी पदार्थ पाण्यात मिसळत नाहीत.