Groom Killed by Gunfire at Wedding in Khagaria Saam
देश विदेश

लग्नसोहळ्यात भयंकर घडलं; नवरदेवाच्या मानेला गोळी लागली, वधू रडून बेहाल, नेमकं घडलं काय?

Groom Killed by Gunfire at Wedding in Khagaria: बिहारमधील खगडियात लग्नसोहळ्यात गोळीबाराचा प्रकार घडला. गोळी थेट नवरदेवाच्या मानेला लागली. उपचारादरम्यान, तरूणाचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

बिहारमधील खगडिया येथे एका लग्नाचा आंनद शोकात बदलला आहे. लग्नानंतर नवरदेवावर गोळी झाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही विधी सुरू होते. सर्वेजण शुभेच्छा, देवणाघेवाण करत होते. यादरम्यान, आनंदोत्सवात विरजण पडलं. भरमंडपात गोळी झाडण्यात आली. एक गोळी थेट नवरदेवाच्या मानेवर लागली. नवरदेवाच्या भावानं या प्रकरणाचा थरार सांगितला. नवरदेवाला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

मोहम्मद इरशाद (वय वर्ष २५) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. ही घटना मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील कुतुबपुर परिसरातून समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास लग्नकार्य पार पडले. नवरदेवाचे भाऊ शमशाद यांनी सांगितले की, 'लग्न झालं. प्रत्येक जण नवविवाहित तरूण आणि तरूणीला शुभेच्छा देत होते. यावेळी गोळीबार करण्यात आला. एकानं हवेत बंदूक लोड केली. मात्र, गोळी थेट इरशादच्या मानेवर लागली.

यानंतर नवरदेवाला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. आरोपी फरार असून, सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर वधुवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबाने शोक व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत वराचा मोठा भाऊ मोहम्मद शमशाद यांनी सांगितले की, 'गोळीबाराचा आवाज जोरदार होता. सर्वांना आवाज ऐकताच धक्का बसला. त्यानं गोळी लोड केली. ट्रिगर गोळी सुटली ती थेट माझ्या भावाच्या मानेला लागली', अशी माहिती त्यानं दिली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांची धक्का एक्स्प्रेसस सुसाट! बड्या नेत्यांनी हाती बांधले घडयाळ

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभूच्या हाउंडस्टूथ प्रिंट सिल्क साडीने वेधले नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा ग्लॅमरस फोटो

Maharashtra Live News Update: यवतमाळ पालिकेत भाजपचा बंडखोर विजयी

AMK Trek : सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात कठीण अन् साहसी ट्रेक, एकाच वेळी अनुभवाला 3 किल्ल्यांचा थरार

आता WhatsApp Call सुद्धा रेकॉर्ड होतील, फॉलो करा या 4 स्टेप्स

SCROLL FOR NEXT