JDU EXPELS ANANT SINGH AND NEELAM DEVI FOR SIX YEARS saam tv
देश विदेश

आमदारासह माजी आमदार पत्नीची पक्षातून हकालपट्टी; विधानपरिषद निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने मोठी कारवाई! राजकारणात खळबळ

Bihar Politics JDU Takes Action Against Anant Singh and Neelam Devi: बिहारमध्ये जेडीयूने मोकामाचे आमदार अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नी, माजी आमदार नीलम देवी यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.

Omkar Sonawane

बिहारमध्ये जनता दल युनायटेड (JDU) पक्षाने मोकामा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाने अनंत सिंह यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले आहे. तसेच अनंत सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार नीलमदेवी यांना देखील सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत JDU ने ही कारवाई केली आहे. अनंत सिंह यांनी पक्षाचे उमेदवार नीरज कुमार यांच्या विरोधात प्रचार केला आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, असे पक्षाकडून सांगण्यात आले. JDU चे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांच्या वतीने यासंदर्भात प्रसिद्ध पत्रक जारी करण्यातआले आहे, यामध्ये अनंत सिंह यांनी पक्षाच्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार नीरज कुमार यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

तसेच पक्षाच्या नेतृत्वाविरोधात अमर्यादित आणि अपमानस्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप अनंत सिंह यांच्यावर करण्यात आला आहे. या सर्व बाबी पक्षविरोधी कारवाया असल्याचे मानत JDU ने अनंत सिंह यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी नीलम देवी यांना देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: धारावीत मतदार यादी पुनरीक्षणात नियमभंग; एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Home Remedies To Repel Spiders : महागड्या स्प्रेची गरज नाही; घरातील 'या' साध्या गोष्टींनी पळवून लावा कोळी

Sleeping After Eating: जेवल्यानंतर लगेच झोपताय? आरोग्यावर होऊ शकतात हे ७ परिणाम

आधी 8 आमदार भाजपात, आता 3 सत्ताधारी पक्षात; पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप

Dhanteras 2026 : यंदा धनतेरस २०२६ कधी आहे? वाचा तिथी अन् पूजेची पद्धत

SCROLL FOR NEXT