Bihar Male Teacher AI
देश विदेश

Bihar Male Teacher: बाईsss काय हा प्रकार! गरोदर सांगून शिक्षकाला दिली ६ महिन्यांची प्रसूती रजा

Bihar Pregnant Male Teacher: बिहारमध्ये एका शिक्षकाला प्रसूती रजा दिल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Bhagyashree Kamble

बिहार नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असतं. बिहारमध्ये सध्या एका गरोदर शिक्षकाची चर्चा चांगलीच रंगली आहे. तिथे एका शिक्षकाला प्रसूती रजा मिळाली आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं ना? पण हो, बिहार राज्यात सध्या 'आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय' अशी परिस्थिती आहे, आणि या परिस्थितीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बिहारमध्ये एका शिक्षकाला प्रसूती रजा दिल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वैशाली जिल्ह्यातील महुआ ब्लॉकमध्ये हा प्रकार घडला. हसनपूर सरकारी शाळेत बिहार लोकसेवा आयोगाने नियुक्त केलेले शिक्षक जितेंद्र कुमार हे १ नोव्हेंबरपासून प्रसूती रजेवर आहेत. ३० ऑक्टोबर रोजी त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. शिक्षकानं सुट्टीचा अर्ज संकेतस्थळावर अपलोडही केला होता. मात्र, शिक्षण विभागाने जितेंद्र यांना गर्भवती असल्याच्या कारणास्तव सुट्टी दिली, आणि शिक्षण विभागाच्या नोंदीनुसार शिक्षक गरोदर आहे, त्यांना या कारणामुळे सुट्टी देण्यात आल्याचं दिसत आहे.

विभागीय शिक्षण अधिकारी अर्चना कुमारी यांनी शिक्षण विभागाकडून झालेली चुक मान्य केली. डाटा एन्ट्री करताना हा प्रकार घडला. चुकीच्या नोंदीमुळं मॅटर्निटी लिव्ह अशी नोंद पोर्टलवर झाली आहे. शिक्षण विभगाच्या ई-शिक्षा कोष पोर्टलवर तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला. पुरूष शिक्षकाला मॅटर्निटी सुट्टी दिली जात नाही. लवकरच यात बदल केले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पत्नीही शिक्षिका, उपचारासाठी घेतली सु्ट्टी

शिक्षक जितेंद्र कुमार सिंह यांच्या पत्नी निधी कुमारी या देखील सरकारी शिक्षिका आहेत. ते लोदीपूर उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. शिक्षक पत्नीचे प्रकृती बिघडल्यानं जितेंद्र यांनी विनावेतन रजा घेतली होती. शिक्षण विभागानं चुकून प्रसूती रजा दिली. याची चर्चा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात रंगली असून, सोशल मीडियावरही घडलेल्या प्रसंगावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT