Bihar Family Tragedy 
देश विदेश

धक्कादायक! बापाने ५ मुलांसोबत गळफास घेतला, ३ मुलींसह चौघांचा मृत्यू,२ मुलांनी जीव वाचवून पळ काढला

Muzaffarpur family suicide incident details बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी बापाने ५ मुलांसोबत गळफास लावला. बाप अन् ३ मुलींचा मृत्यू झाला. दोन मुलांचा जीव वाचला.

Namdeo Kumbhar

Bihar Family Tragedy : बिहारमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झालाय. बापाने ३ मुली, दोन मुलांसोबत गळफास घेत सामूहिक आत्महत्या केली. २ मुलांनी गळफास तोडून पळ घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण बाप अन् तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. सामूहिक आत्महत्याने बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये खळबळ उडाली. बापाने ५ मुलांसोबत आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? या टोकाच्या निर्णायाचे कारण काय? त्या मुलांची नेमकी चूक काय होती? असा सवाल विचारला जातोय.

मुजफ्फरपूरमधील नवलपूर मिश्रुलिया गावात सामूहिक आत्महत्येची ही धक्कादायक घटना घडली. ४० वर्षाचा अमरनाथ राम यांनी ५ मुलांसोबत सामूहिक आत्महत्या केली. राधा कुमारी (११), राधिका (९) आणि शिवानी (७) या मुलींचा मृत्यू झाला. शिवम अन् चंदन पळून गेल्यामुळे जीव वाचला. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार , अमरनाथ राम यांनी पत्नीच्या साडीने घरातच फास बांधून टोकाचा निर्णय घेतला. अमरनाथ राम यांच्या त्यांच्या पाच मुलांच्या गळ्यातही हा फास बांधला. शिवम आणि चंदन या दोघांनाही गळफास घेण्यास भाग पाडले. अमरनाथने याने पत्नीच्या साडीने पाचही मुलांच्या गळ्यात फास बांधला. त्यांना घरातील जुन्या पेटीवर चढायला लावले अन् घराच्या छताला लटकवले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

शिवम आणि चंदन या दोघांचा जीव वाचला. पोलिसांनी दोघांचा जबाब नोंदवला. शिवमने पोलिसांना सांगितले की, 'वडिलांनी सर्व मुलांना पेटीवर चढून उडी मारण्यास सांगितले. तिन्ही मुलींनी त्यांच्या वडिलांसोबत उडी मारली.' शिवमनेही उडी मारली होती पण घशात तीव्र वेदना होत असल्याने फास सोडला आणि स्वतःला बाहेर काढले. शिवमने धाकटा भाऊ चंदनच्या गळ्यातील फास सोडला आणि त्याला वाचवले. त्यानंतर शिवमने घरातून बाहेर पळ काढला अन् आवाज दिला. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले.

गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, अमरनाथच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर अमरनाथ मानसिक त्रासात होता. तो पत्नीच्या आठवणीत झुरत होता. त्यामधून त्याने टोकाचा निर्णय घेतला. अमरनाथ राम बेरोजगार होता आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सरकारी रेशनवर त्याचे घर चालत होते. कौटुंबिक कारण अन् आर्थिक परिस्थितीमुळेच त्याने आयुष्य संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT