Sushil Kumar Modi News:
Sushil Kumar Modi News: Saamtv
देश विदेश

Sushil Kumar Modi: भाजप नेते सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर, ६ महिन्यांपासून सुरू आहे संघर्ष

Gangappa Pujari

Sushil Kumar Modi Cancer:

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. स्वतः सुशिलकुमार मोदी यांनी एक्स माध्यमावर ट्वीट करत गेल्या ६ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगितले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कोणतेही काम करु शकत नाही, असेही सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त असल्याची माहिती दिली आहे. तसेच आगामी निवडणुकीत काही मदत करु शकत नाही असेही सुशीलकुमार मोदी म्हणालेत. एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी आपल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे.

"गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे. आता लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. याबद्दल सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. सदैव कृतज्ञ आणि देश, बिहार आणि पक्षासाठी समर्पित," असे सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री पदासोबतच सुशील कुमार मोदी राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. मात्र, यंदा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही. याशिवाय त्यांनी आपल्या दिर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक अनेक पदे भूषवली आहेत. आपल्या 33 वर्षांच्या जीवनात ते राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद आणि विधानसभेसह चारही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी पाच वर्षे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT