NDA and INDIA alliance face seat-sharing deadlock ahead of Bihar Elections 2025. saam tv
देश विदेश

NDA अन् INDIA आघाडीला जागा वाटपाचं मुहूर्त सापडेना! दावेदारीत अडकली पक्षाची रणनीती, आता नवी तारीख आली समोर

Bihar Elections 2025: एनडीएचे छोटे मित्रपक्ष आधीच सार्वजनिकरित्या त्यांच्या मागण्या मांडत आहेत. एलजेपी (रामविलास) नेते अरुण भारती सोशल मीडियावर सन्माननीय वाटा मागत आहेत. आणि भाजप आणि जेडीयूवर दबाव आणत आहेत.

Bharat Jadhav

बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे एनडीए आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची अस्वस्थता वाढू लागलीय. मित्रपक्ष जागावाटपासाठी सतत दबाव आणत आहेत, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतरच औपचारिक चर्चा सुरू होईल. तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. निवडणूक आयोग नवरात्र संपल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत निवडणूकांची घोषणा करू शकते.

एनडीएमधील घटक पक्ष आपल्या मागण्या सार्जनिक करत आहेत. एलजेपी(रामविलास ) नेता अरुण भारती यांनी सोशल मीडियावर यांनी आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा देण्यात याव्यात अशी मागणी केलीय. दुसरीकडे हम(से) चे प्रमुख जीतन राम मांझी यांनीही आपल्या महत्त्वकांक्ष सर्वांसमोर ठेवल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (रामिवला) नेते चिराग पासवान आणि आरएलपी प्रमुख उपेंद्र कुशवाह यांची दिल्लीत भेट झाली, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी मगध-शहााबाद प्रदेशात पुरेशा जागा मिळाव्यात,अशी इच्छा व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि रॅलींना संबोधित केले. या बैठकींमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दुर्गापूजेनंतर एनडीए मित्रपक्षांमधील जागावाटप अंतिम केलं जाईल.

इंडिया अलायन्समध्येही संघर्ष

'इंडिया' अलायन्समध्येही जागा वाटपावरून वाद सुरू आहे. आरजेडीने जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केलीय. २०२० च्या निवडणुकीत सीपीआय(एमएल) ने १९ जागा लढवल्या आणि १२ जागा जिंकल्या. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेल्या जागा वाटपावेळी दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना आता अधिक जागा हव्यात. तर व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनी म्हणाले की, जर आघाडीचं सरकार आलं तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पैसे मागण्यावरून तृतीयपंथीयाचा कोल्हापुरात राडा; पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण, VIDEO व्हायरल

Sabudana Side Effects: साबुदाणे खाल्याने नुकसान होतं का?

Filmfare Awards: ७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन जाहीर; संपूर्ण यादी वाचा

Election Commission : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती

Asia Cup 2025 Final जिंकण्यासाठी 'त्याला' संधी द्याच, IND vs Pak सामन्याआधी दिग्गजाची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT