उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शेण आणि दगडफेक
राजद पक्षाच्या कार्यकर्त्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव.
उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेवर टीका केली.
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान लखीसरायमध्ये मोठा राडा झाला. राजदच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या कारला घेराव घालत त्यांच्या वाहनावर दगडफेक आणि शेणफेक केली. आरजेडी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी लखीसराय एपीसींना फोन केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका केली.
लखीसरायच्या बूथ नंबर ४०४ आणि ४०५ कडे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. आरजेडीचं कार्यकर्ता मतदान प्रक्रियेत अडथळे आणत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. लखीसरायमध्ये एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांच्या ताफ्यामधील वाहनांवर शेण फेकण्यात आले. यातून राजद पक्षाची मानसिकता कशी आहे, याचे हे दर्शन आहे, असं उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणालेत.
या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये विजय सिन्हा माध्यमांशी बोलत असताना काही लोकांनी सिन्हा यांच्या ताफ्याला अडवलं. घोषणाबाजी करत आणि तेथे राडा घातला. आणखी एका व्हिडिओमध्ये काही लोक विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर शेण फेकत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.
दरम्यान विजय सिन्हा हे लखीसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ही घटना लखीसराय येथील खोरियारी गावात घडली. विजय सिन्हा त्यांच्या मतदारसंघातील खोरियारी गावात जात होते. त्यावेळी राजद समर्थकांनी त्यांच्या वाहनाला घेरलं, त्यांच्यावर चप्पल, दगड आणि शेण फेकले आणि "मुर्दाबाद !" अशा घोषणा राजदच्या कार्यकर्त्यांनी दिल्या, असं विजय कुमार सिन्हा म्हणाले.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती देताना त्यांनी पोलीस अधीक्षकांवर टीका केली. एसपी भित्रे आणि कमकुवत आहेत, असं म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याशी बोलल्यानंतर लखीसरायचे एसपी अजय कुमार तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.