आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
“मराठी सिंघम” म्हणून ओळखले जाणारे लांडे यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
लांडे यांच्या राजकीय प्रवेशामुळे महाराष्ट्रात चर्चा रंगल्या आहेत.
अकोल्यातील शेतकरी कुटुंबात शिवदीप लांडेंचा जन्म झाला. लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून लांडे हे पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक आणि मुंगेर, अररियासारख्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुखही राहिलेत. त्यानंतर बिहारमधून प्रतिनियुक्तीवर मुंबईत आल्यावर त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्र एटीएसमध्ये आयजी म्हणूनही काम केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये ते पुन्हा बिहारच्या कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक ((DIG) झाले. त्यानंतर बढती मिळून तिरहुत आणि पूर्णिया आयजी म्हणून काम केलयं.
मराठमोळे शिवदीप लांडे जवळपास 18 वर्षांपासून बिहारमध्ये प्रशासकीय सेवेत कार्यरत होते.मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर शिवदीप लांडेंनी एप्रिल 2025 मध्ये हिंद सेना पक्षाची स्थापना केली.. मात्र पक्षाची नोंदणी रखडल्यानं त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी थेट अपक्ष म्हणून निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतलाय. ते बिहारमधील जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत.
प्रशासकीय सेवेतून राजकारणात प्रवेश करणं काही नवीन नाहीय. बिहारच्याच राजकारणात गुप्तेश्वर पांडेय, आनंद मिश्रा, विकास वैभव सारखे माजी पोलिस अधिकारीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
मात्र मराठमोळ्या शिवदीप लांडेंनी महाराष्ट्राऐवजी थेट बिहारमध्ये निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतलाय.त्यामुळे प्रशासकीय सेवेतून आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे शिवदीप लांडे. विधानसभा निवडणुकीतही आपला सिंघम दबदबा कायम राखणार का ?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.