बिहारमध्ये तरुणाने स्वत:चं गुप्तांग कापलं
बायकोसोबतच्या भांडणानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
तरुणाची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू
तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे
बिहारमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणानंतर २५ वर्षीय तरुणाने धारदार शस्त्राने स्वत:चे गुप्तांग कापले. त्यानंतर त्याने गळ्यावर देखील वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसडिहरा गावामध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा काही दिवसांपासून बायकोसोबत वाद सुरू होता. मंगळवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर त्याने धारदार शस्त्राने आपले गुप्तांग कापून शरीरावेगळं केलं. ऐवढेच नाही तर त्याने गळ्यावर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आसपासच्या नागरिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं आणि कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
डॉक्टारांनी सांगितले की, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी वाराणसीला हलवण्यात आले. तरुणाने गुप्तांग कापल्यामुळे तो नपुंसक झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. पण त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे मानसिक कारणे असू शकतात, असे देखील डॉक्टरांनी सांगितले. ऐवढी गंभीर घटना घडून सुद्धा पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही.
या घटनेमुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचीच चर्चा होत आहे. मानसिक त्रासातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. मानसिक ताण आणि कौटुंबिक वाद एखाद्या व्यक्तीवर किती परिणाम करू शकतो हे या घटनेमुळे विचार करण्यास भाग पाडले. अशा घटना टळण्यासाठी वेळीच समुपदेशन आणि आधार मिळणे खूप गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.