Bihar Crime News Saam tv
देश विदेश

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Bihar Crime News : बिहारमध्ये पत्नीने नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटत असल्याची तक्रार पोलिसांत केली. तपासादरम्यान पलंगाखाली देशी पिस्तूल सापडल्याने पोलिसांनी पतीला शस्त्रास्त्र कायद्यानुसार अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • पत्नीच्या फोन तक्रारीमुळे पोलिसांना संशय

  • घरात धाड टाकल्यानंतर पलंगाखाली पिस्तूल सापडली

  • पतीला शस्त्रास्त्र कायद्यानुसार अटक

  • महिलांच्या घरगुती सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पती-पत्नींमधील वादाच्या कथा अनेकदा समोर येतात, मात्र बिहारच्या बेतिया येथील ही गोष्ट हादरवणारी ठरली आहे. एका महिलेने तिला नवऱ्यासोबत झोपायची भीती वाटत असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनाही संशय आला. त्यांनी महिलेच्या घरी धाड टाकताच धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी बेतियाहच्या मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील महानागनी गावात घडली. या गावातील एका महिलेने स्वतः पोलिसांना फोन करून तक्रार केली की, "मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते. तो झोपताना बंदूक घेऊन झोपतो. मला भीती वाटते या बंदुकीमुळे काहीतरी चुकीचे होईल. "

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तिच्या घरी धाव घेतली. महिलेच्या घरी गेल्यावर तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाअंती पोलिसांनी बेडरूममध्ये धाड टाकली. बरीच शोधाशोध केल्यावर तपासादरम्यान पलंगाखाली पोलिसांना देशी बनावटीची पिस्तूल सापडली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शस्त्र साठ्यासह अटक केली आहे. शिवाय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

Traditional Jewellery: गौरीसाठी नथ, ठुशी आणि बोरमाळ; 5 पारंपरिक सोन्याचे दागिने

Vitamin deficiency: हात-पाय सुन्न पडत असतील तर शरीरात असू शकते 'ही' कमतरता

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT