देश विदेश

Shocking: टोकाचं भांडण! गरोदर बायकोला अमानुष मारहाण करत जागीच संपवलं, छतावरून उडी मारून नवरा फरार

Bihar Crime News: जमुई जिल्ह्यातील गिधौरमध्ये एका पतीने गर्भवती पत्नीवर निर्दय हल्ला केला, तिचा गळा चिरला आणि नंतर आरोपीने घराच्या छतावरून उडी मारून पळ काढला, पोलिसांनी त्वरित कारवाई सुरु केली.

Dhanshri Shintre

  • जमुई जिल्ह्यातील गांधी आश्रम परिसरात पतीकडून गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या.

  • सरिता देवी (२५) हिला तिच्या पतीने धारदार शस्त्राने ठार मारले.

  • लग्नानंतरपासूनच पतीकडून सरितावर शारीरिक अत्याचार होत असल्याचे उघड.

  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू.

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील गिधौर पोलीस स्टेशन हद्दीतील गांगरा पंचायतीच्या गांधी आश्रम परिसरात एका पतीने स्वतःच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सरिता देवी (२५) असे मृत महिलेचे नाव असून, ती गांधी आश्रमातील रहिवासी मनो रावत यांची सून आहे. वैयक्तिक वादातून झालेल्या या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, बुधवारी दुपारी सरिता देवी आणि तिचा पती शुभम कुमार यांच्यात पुन्हा वाद झाला. यापूर्वीही या दाम्पत्यामध्ये सातत्याने भांडण होत असल्याची शेजाऱ्यांकडून माहिती मिळत आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शुभमने पत्नीला खोलीत कोंडून ठेवले आणि प्रचंड मारहाण केल्यानंतर धारदार शस्त्राने तिचा गळा चिरत तिची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर कुटुंबीय काही समजत नव्हते. तेवढ्यात शुभमने छतावरून उडी मारून घरातून पलायन केले.

या घटनेनंतर गिधौर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. सरिता देवीचा भाऊ सागर कुमार यांनी सांगितले की, २०२२ मध्ये तिचे लग्न शुभम कुमारशी झाले होते आणि त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. लग्नानंतरपासूनच शुभम सतत सरितावर शारीरिक अत्याचार करत होता.

दरम्यान, स्टेशन हाऊस ऑफिसर दीनानाथ सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, सध्या मृताच्या कुटुंबीयांची जबाब नोंदवली जात आहे. पोलिसांनी आरोपी शुभम कुमारचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक सदस्यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठक

Gas Cylinder Expiry: तुमचा गॅस सिलेंडर एक्सापायर तर झाला नाही ना? आताच असं तपासा, अन्यथा...

Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

Film Festival: ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार सन्मान

SCROLL FOR NEXT