Bihar Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Bihar Crime: बिहारमध्ये तृतीयपंथीयांनी महिलेवर गोळ्या झाडल्या. या महिलेला मुलगा झाल्यानंतर तृतीयपंथीयांनी तिच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. महिलेने पैसे द्यायला नकार दिल्यामुळे तृतीयपंथीयांनी गोळीबार केला.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये गोळीबाराची भयंकर घटना घडली

  • मुलगा झाल्यानंतर पैसे न दिल्यामुळे तृतीयपंथी संतप्त झाले

  • पैसे न दिल्यामुळे संतप्त होत त्यांनी महिलेवर गोळीबार केला

  • या गोळीबारात महिलेची बहीण गंभीर जखमी झाली

बिहारच्या पाटणा सिटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मुलाच्या जन्मानंतर तृतीयपंथीयांनी १ लाख रुपये मागितले. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी महिलेवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये महिला बचावली पण तिच्या बहिणीला गोळी लागली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाटणा शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये बुधवारी दुपारी घडली. किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तृतीयपंथीयांनी महिलेवर गोळीबार केला. या गोळीबारात नीरज कुमार यांची बायको काजल कुमारी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी काजलने पोलिसांना सांगितले की, तिच्या मोठ्या बहिणीचे तृतीयपंथीयांसोबत भांडण झाले होते. बहिणीला बाळ झाल्यामुळे त्यांना घरी येऊन नाचगाण्याचा कार्यक्रम करायचा होता. पण बहिणीने नकार दिला. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला.

या वादानंतर बुधवारी दुचाकीवरून दोन तृतीयपंथी त्यांच्या घराजवळ आले. त्यांचा हेतू जखमी महिलेच्या बहिणीवर हल्ला करण्याचा होता. पण महिलेची बहीण घरात होती. जखमी महिला दाराजवळ होती. तृतीयपंथीयांनी महिलेल्या घराच्या दिशेने गोळीबार केला. ही गोळी महिलेच्या हाताला लागली. जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जखमी काजल कुमारीचा नवरा नीरज कुमार यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीने एका मुलाला जन्म दिला. हे कळताच तृतीयपंथी त्यांच्या घरी आले. कुटुंबाने आनंदाने त्यांना ११,००० रुपये दिले. पण तृतीतयपंथी त्यांच्याकडे १,००,००० रुपये मागत होते. जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या भांडणातूनच बुधवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत माझ्या बायकोच्या हाताला गोळी लागली. कुटुंबाने जखमी काजलला ताबडतोब एनएमसीएचमध्ये दाखल केले आणि तिचे प्राण वाचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT