Shocking Crime Saam Tv News
देश विदेश

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

12-Year-Old Girl Saved from Trafficking: बिहारच्या मुझफ्फरपूरमधील धक्कादायक प्रकार उघड. रेड लाईट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न उघड. स्थानिकांनी आरोपीला चोपलं.

Bhagyashree Kamble

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध रेड लाइट एरियामधून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. १२ वर्षांच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करताना स्थानिकांनी एका तरूणाला रंगेहाथ पकडलं. संतप्त जमावाने प्रथम त्याला बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या पोलिसांनी मुलगी आणि आरोपीला पोलीस ठाण्यात नेले. दोघांचीही चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणानं आधी अल्पवयीन मुलीलासोबत चतुर्भुज येथे नेले. काही कारण सांगून तरूण तिला रेड एरियामध्ये घेऊन गेला. मुलीला विकण्याच्या उद्देशाने तो दलालाशी बोलत होता. वाटाघाटी सुरु असताना स्थानिक नागरिकांना काही गोष्टी विचित्र वाटल्या. त्यांनी तातडीने तरूण आणि मुलीच्या भोवतीने घेराव घालून तरूणाला बेदम चोप दिला.

यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ चतुर्भुज येथे पोहोचून आरोपीला गर्दीतून सोडवले. तसेच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीलाही सुरक्षितपणे त्यांच्या संरक्षणात घेतले. पोलीस तपासात अल्पवयीन मुलगी समस्तीपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलीनं सांगितले की, तिला बोचहा येथून जबरदस्तीने या ठिकाणी आणलं. तर, आरोपी तरूण हा दरभंगा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करीत आहेत. या घटनेत मानवी तस्करीचा समावेश आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक

Samantha Ruth Prabhu : पाय लटपटले, पदर ओढला; समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली, पाहा व्हायरल VIDEO

Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

PM Narendra Modi : महायुतीच्या विजयानंतर PM मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले - 'महाराष्ट्र विकासाच्या...'

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT