Bihar Caste Census Report saam Tv
देश विदेश

Bihar Caste Census Report: बिहार राज्यातील जातीनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर; कोणात्या समाजाची आहे लोकसंख्या जास्त?

Bihar News : बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणना केली होती, त्याचा रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला.

Bharat Jadhav

Bihar Caste Census Report:

बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, त्याचा रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला. बिहार सरकारमधील अप्पर मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी हा रिपोर्ट जाहीर केलाय. बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीपेक्षा जास्त आहे. या रिपोर्टनुसार, बिहार राज्यात सामान्य वर्गाची लोकसंख्या १५ टक्के आहे. तर इतर मागासवर्गीयाची (ओबीसी) लोकसंख्या ६३ टक्के आहे. (Latest News)

अनुसूचित जातीची लोकसंख्या २० टक्के आहे. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार खूप आग्रही होते. बिहार सरकारनं एकूण २१४ जातीमधील आकडे जाहीर केली आहेत. यात अशा काही जाती आहेत त्याची लोकसंख्या ही १०० पेक्षा कमी आहे.

बिहारमध्ये ८१.९९ टक्के हिंदू

बिहारमध्ये ८१.९९ टक्के म्हणजेच साधरण ८२ टक्के हिंदू आहेत. तर इस्लाम धर्माची संख्या १७.७ टक्के आहे. शीख, ख्रिश्चन, बौद्ध जैन या धर्माची लोकसंख्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तर राज्यातील २ हजार १४६ लोकांनी आपला धर्म सांगितला नाहीये. बिहार राज्यात भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सरकार होती. त्यावेळी बिहार विधानसभा आणि विधान परिषदेत राज्यात जातीनिहाय गणना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. कोरोनाची स्थिती निवाळल्यानंतर १ जून २०२२मध्ये सर्वदलीय बैठकीत जातीनिहाय गणना करण्यास सर्वमतानं प्रस्ताव पारित करण्यात आला होता.

कोणत्या वर्गाची लोकसंख्या किती आहे ते जाणून घ्या

  • सामान्य वर्ग (General category)- १५.५२ टक्के

  • मागसवर्गीय- २७.१२ टक्के

  • ओबीसी - ३६.१ टक्के

  • अनूसूचित जाती- १९.६५ टक्के

  • अनूसचित जनजाती - १ .६८ टक्के

कोणत्या जातीची लोकसंख्या किती

  • ब्राह्मण- ३.६७ टक्के

  • राजपूत- ३.४५ टक्के

  • भूमिहार- २.८९ टक्के

  • कायस्थ - ०.६० टक्के

  • यादव - १४.२६ टक्के

  • कुरमी- २.८७ टक्के

  • तेली- २.८१ टक्के

  • मुसहर- ३.०८ टक्के

  • सोनार-०.६८ टक्के टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

SCROLL FOR NEXT