Bihar Cabinet Expansion Update Saam TV Marathi News
देश विदेश

Cabinet Expansion : नितीश कुमारांच्या मुलासह ३२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, टीम 'सम्राट'मध्ये कोण कोण?

Bihar Cabinet Expansion Update : बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार झाला असून ३२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या मुलासह अनेक दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Bihar CM Samrat Chaudhary Cabinet Vistar News Live Updates: बिहारमधील भाजपचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. पाटणामधील गांधी मैदानावर ३२ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यामध्ये नितीश कुमार यांच्या मुलाचाही समावेश आहे. आता कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते दिले जाणार? याची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. भाजप आणि जनता दल पक्षाचे किती मंत्री होणार, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भगवान सिंह कुशवाह, अरुण शंकर प्रसाद, मदन साहनी, डॉ. संतोष कुमार सुमन, रमा निषाद, रत्नेश सदा, कुमार शैलेंद्र, शीला कुमारी, केदार प्रसाद गुप्ता आणि लखेंद्र कुमार रोशन यांच्यासह ३२ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

गांधी मैदानात दुपारी १२.१० वाजता मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नीतीश कुमार, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्यसभा खासदार आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण पाटण्यात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर "विकसित भारत, विकसित बिहार" असा मेसेज टाकण्यात आला आहे. गांधी मैदानात भाजप आणि जनता दलाच्या प्रत्येकी १६ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्याचे बोलले जातेय.

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार करण्यात आला. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय सिन्हा, दिलीप जयस्वाल, श्रवण कुमार, निशांत कुमार आणि लेसी सिंग यांना पदाची शपथ घेतली. रामकृपाल यादव, नितीश मिश्रा, दामोदर रावत, संजय सिंह टायगर आणि अशोक चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मदन साहनी, भगवान सिंह कुशवाह, अरुण शंकर प्रसाद, संतोष कुमार सुमन आणि रमा निषाद यांचाही चौधरी मंत्रिमंडळात समावेश झाला. रत्नेश सदा, कुमार शैलेंद्र, शीला कुमार, केदार प्रसाद गुप्ता आणि लखेंद्र कुमार रोशन यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

कुणी कुणी घेतली शपथ? पाहा लिस्ट

श्रवण कुमार

विजय कुमार सिन्हा

दिलीप कुमार जायसवाल

निशांत

श्रीमती लेशी सिंह

राम कृपाल यादव

नीतीश मिश्रा

दामोदर रावत

संजय सिंह 'टाईगर'

अशोक चौधरी

भगवान सिंह कुशवाहा

अरूण शंकर प्रसाद

मदन सहनी

संतोष कुमार सुमन

श्रीमती रमा निषाद

रत्नेश सादा

कुमार शैलेन्द्र

श्रीमती शीला कुमारी

केदार प्रसाद गुप्ता

लखेन्द्र कुमार रौशन

सुनील कुमार

सुश्री श्रेयसी सिंह

जमा खान

नन्दकिशोर राम

शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT