boat carrying 18 laborers capsized in the Ganges River in Bhagalpur saam tv
देश विदेश

Bhagalpur Boat Accident: गंगा नदीत 18 मजुरांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 6 जण बेपत्ता

Bihar Boat Accident: भागलपूरमधील राघोपूर पंचायतीमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. गंगा नदीत मजुरांची बोट उलटली. बोटीवर एकूण १८ मजूर होते.

Bharat Jadhav

  • भागलपूरच्या गंगा नदीत मोठी दुर्घटना

  • १८ मजुरांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली.

  • बोटीवरील ६ मजूर बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीत मुजरांची बोट बुडाली असून या बोटीमध्ये १८ मजूर होते. नौगछिया पोलीस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खरिक ब्लॉकमधील राघोपूर पंचायतीच्या हद्दीत आज ही दुर्घटना घडलीय. गंगेच्या वाढत्या पाणीपातळीत आणि वेगवान प्रवाहात नदीकाठच्या बांधाच्या संरक्षण काम करण्यासाठी हे मजूर जात होते.

नदीतून प्रवास करताना मजुरांची ही बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीच्या मधोमध उलटली. नौका उलटताच घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. या घटनेचा एक हृदयद्रावक व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. राघोपूर पंचायत हे बिहार सरकारचे ऊर्जामंत्री शैलेश कुमार, ऊर्फ बुलो मंडल यांचे मूळ गाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गंगेचा मुख्य प्रवाहात वाढ झालीय. काझिकोराईया-राघोपूर जमीनदारी किनाऱ्यारवरील तटावर प्रचंड दबाव वाढलाय.

किनाऱ्यावरील तट फुटण्यापासून वाचवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या सूचनांनुसार कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणावर पूर-संरक्षणाचे काम केले जातंय. या कामाचा एक भाग म्हणून, भागलपूर जिल्ह्यातील विविध भागांतील मजूर आणि बांधकामाचे साहित्य बोटीतून नदीपलीकडे नेत होते. त्याचवेळी प्रवाहाच्या जोरदार वेगामुळे त्या बोटीचं नियंत्रण गेलं आणि बोट उलटली.

१२ कामगार सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहोचले

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर एकूण १८ कामगार होते. बोट उलटताच अनेक कामगारांनी पोहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी १२ जण पोहत सुरक्षितपणे नदीकाठावर पोहोचले. उर्वरित सहा कामगार नदीच्या प्रबळ प्रवाहामुळे वाहून गेले असावेत किंवा ते बेपत्ता झाले असावेत, अशी भीती व्यक्त केली जातेय. एसडीआरएफचं पथ त्यांचा शोध घेत आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि एसडीआरएफ (SDRF) चे पथक मोटारबोटी व लाइफ जॅकेट्ससह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंगा नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ पाणबुड्यांच्या मदतीने व्यापकपद्धतीने बचावकार्य सुरू आहे. बोटीमध्ये कंत्राटदार धूप-प्रतिबंधक काम करत होते. त्यात विविध भागांतील मजूर सहभागी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात भाजपच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेची एंट्री

8th Pay Commission : ३% वरून थेट ७%! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ?

Rain Alert : महाराष्ट्रातील विदर्भासह अनेक राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी, वाचा हवामानाचा अंदाज

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, लोकल रेल्वे स्थानकावर येताच अचानक धूर निघू लागला अन्...; पाहा VIDEO

Narali Purnima : नारळी पौर्णिमेला ५ मिनिटात काय बनवाल? खोबऱ्याची करंजी की खोबऱ्याची बर्फी

SCROLL FOR NEXT