कन्नौज येथे भीषण रस्ते अपघात
काँग्रेस नेते प्रवीण सिंह कुशवाह यांचा मृत्यू
तीन जण गंभीर जखमी
उत्तर प्रदेशातील कनौज येथे झालेल्या अपघातात भागलपूरमधील काँग्रेस अध्यक्षाचे निधन झाले आहे. बिहारमधील भागलपूरचे नवनियुक्त जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण सिंह कुशवाह हे दिल्लीहून भागलपूरला परत येत होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातात काँग्रेस अध्यक्षांची वहिनी, पुतण्या आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रवीण सिंग कुशवाह यांचे निधन झाले. तर इतर तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रवीण सिंह कुशवाहा यांची महिनाभरापूर्वीच भागलपूर जिल्हा काँग्रेस नेतृत्वपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचे आभार मानले होते.
पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी एका तळागाळातील नेत्यावर सोपवल्यामुळे संघटना अधिक मजबूत होईल, असं त्यांनी खरगे यांचे आभार व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली होती. जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटनेप्रती आपली अढळ निष्ठा व्यक्त केली होती. आपल्या आयुष्यात पक्ष आणि संघटनेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही असेही ते म्हणाले होते.
भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघाताची ही घटना शमशाबाद परिसरातील आउटर रिंग रोडवरील एक्झिट-१६ जवळ घडली. कार भरधाव वेगात जात होती त्यावेळी चालकाचे कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून यात दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.