RBI Monetary Policy June 2023 Saam TV
देश विदेश

RBI Repo Rate: महागाईने पिचलेल्या जनतेला मोठा दिलासा; आरबीआयकडून नवीन पतधोरण जाहीर

RBI Monetary Policy June 2023: महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. आरबीआयने आपले नवीन पतधोरण जाहीर केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

RBI Monetary Policy June 2023: महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. आरबीआयने आपले नवीन पतधोरण जाहीर केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे अशा स्थितीत कर्जदारांच्या कर्जदाचा हफ्ता वाढणार नाही. (Latest Marathi News)

विशेष बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या चालविषयक समितीच्या बैठकीत आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यातही व्याजदरात वाढ झाली नव्हती. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारीमाडे २५ बेसिस पॉइंटने वाढ झाली होती.

६ जून पासून आरबीआयने च्या (RBI) पतधोरणाची बैठक सुरू होती. जवळपास तीन दिवस ही बैठक चालली. आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निकाल जाहीर केले. यावेळीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. महागाई ४ टक्क्यांपेक्षाही कमी करणे हे आमचे लक्ष आहे. आमच्या अंदाजानुसार २०२३-२४ मध्ये त्यापेक्षा जास्त राहील. यासोबतच त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

वर्षभरात रेपो रेट २.५% वाढला

गेल्या वर्षभरापासून सर्व प्रकारच्या कर्जावरील (Loan) व्याजदर वाढले, ज्याचा थेट परिणाम बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जावर दिसून आला. बँकांनी सर्व श्रेणींच्या कर्जाचे व्याजदर वाढवले, मग ते वैयक्तिक कर्ज असो, कार लोन, गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज. मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकांनी देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली.

पण वर्षभरात रेपो दरात वाढ होण्याचाही एक फायदा म्हणजे बँक ठेवींवरील व्याजदरात वाढ झाली. याशिवाय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी दीर्घ मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णयही घेतला गेला. हेच कारण आहे की यावेळी बँक एफडीवर खूप चांगले व्याजदर मिळत आहेत.

महागाई ५ टक्क्यांच्या खाली

सध्या महागाईचा दर ५% खाली असून एप्रिलचे आकडे याची साक्ष देतात. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर ४.७०% होता, जो मार्च महिन्यात ५.६ टक्के होता. म्हणजे दोन महिन्यांत महागाईचे आकडे आरबीआयच्या मर्यादा पातळीपासून खाली आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यामुळेच आरबीआय यावेळी महागाईच्या आकडेवारीचा अंदाज कमी करू शकते.

रेपो दर म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT