India Alliance Meeting Saam Tv
देश विदेश

India Alliance Meeting: जनतेनं एनडीएला कौल दिलाय, इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार: मल्लिकार्जुन खरगे

National Politics News : जनतेनं एनडीएला कौल दिलाय, इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.

Satish Kengar

जनतेनं भाजप आणि एनडीएला कौल दिला असून इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, "आघाडीच्या नेत्यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर दोन तास चर्चा केली. अनेक सूचना मिळाल्या आणि आजच्या परिस्थितीवर चर्चा झाली."

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "इंडिया आघाडीचे घटक भारतीय जनतेचे आमच्या आघाडीला मिळालेल्या उदंड पाठिंब्याबद्दल आभार मानतात. जनतेच्या जनादेशाने भाजप आणि त्यांच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय राज्यघटनेसह इंडिया आघडी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट राजवटीविरुद्ध लढत राहील.''

दरम्यान, इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात ते म्हणाले की, ''ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावाने आणि चेहऱ्यावर लढली गेली. जनतेने भाजपला बहुमत न देऊन त्यांच्या नेतृत्वाबद्दल स्पष्ट संदेश दिला आहे. वैयक्तिकरित्या मोदीजींसाठी हा केवळ राजकीय पराभव नाही, तर नैतिक पराभवही आहे. पण त्यांच्या सवयी आपल्या सर्वांना माहीत आहेत. हे जनमत नाकारण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील.''

खरगे म्हणाले होते की, मी इंडिया आघाडीच्या सर्व मित्रांचे स्वागत करतो. आम्ही एकत्र लढलो, समन्वयाने लढलो आणि पूर्ण ताकदीने लढलो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन. 18व्या लोकसभा निवडणुकीतील जनमत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याचे खरगे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शासकीय निवासस्थानी 10, राजाजी मार्ग येथे ही बैठक झाली. खरगे यांच्याशिवाय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधी वढेरा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, शरद पवार, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT