Fake Female Sub Inspector
तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती वर्दीचा धाक दाखवून समोरच्याला गप्प करायची. कधी ती एडीजी सोबत टेनिस खेळायची तर कधी माजी डीजीपीच्या मुलीच्या लग्नात पाहुणी म्हणून हजेरी लावायची. कधी एखाद्या कोचिंग सेंटरमध्ये जाऊन पोलीस परीक्षा कशी द्यायची, कसं पास व्हायचं, याविषयी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायची. एकूणच तिचा रुबाब असा होता की मोठे मोठे अधिकारी पण फसले. मात्र, तिचा रुबाब, पोलिसी चालचलन आणि खाक्या वर्दीतीला चेहरा समोर आला, तेव्हा सर्वच अचंबित झाले.
Fake Female Sub Inspector
ती कोणी पोलीस अधिकारी नव्हती तर ती एक नंबरची ठग निघाली, जिने राजस्थान पोलीस अकॅडमीतील उणीवांचा फायदा घेत अनधिकृतरित्या पोलीस सब इंस्पेक्टरची ट्रेनिंग घेतली होती. दरम्यान तिने पोलिसवाली असण्याचा असा माहोल बनवला होता की, तिला ओळखणाऱ्यांचा तर यावर विश्वासच बसत नव्हता. ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील तोतया सब इंस्पेक्टर आणि वय फक्त २३ असलेल्या मोना बुगालियाची.
Fake Female Sub Inspector
मोनाचं लहानपनापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अनेकवेळा प्रयत्नही केला होता. त्याहीपुढे तिने इन्स्पेक्टर भरतीची तयारी केली, परीक्षाही दिली. मात्र लाख प्रयत्नांनंतरही ती या परीक्षेत यशस्वी झाली नाही आणि हे अपयश ती सहन करू शकली नव्हती. इथूनच मोनाचे पाय चुकीच्या गोष्टींकडे पडू लागले.
पोलीस अधिकारी बनण्याच्या तिच्या महत्त्वाकांक्षेने तिला अक्षरशः वेडं बनवलं होतं. त्यामुळे तिने पहिल्यांदा सोशल मीडियावर आपण सब इंस्पेक्टरची परीक्षा पास झाल्याची अफवा पसरवली. तिचं कौतुक होऊ लागलं आणि तिच्या या कौतुकाने तिला तिच्या ध्येया पर्यंत पोहावलं, आता तिला मागे वळून पाहायचं नव्हतं. आता तिने अनेक शक्कली लढवायला सुरुवात केली.
पोलीस अकॅडमीचा असा उठवला फायदा
मोनाने राजस्थान पोलीस अकॅडमीमध्ये असलेल्या काही उणीवांचा फायदा घेत अॅकॅडमीत प्रवेश मिळवला. पूर्ण दोन वर्षांपर्यंत ती प्रशिक्षण घेत होती आणि याची साधी भनक सुद्धा अकॅडमीच्या अधिकाऱ्यांना लागली नाही. कारण ती अतिशय शिताफीने या सर्व गोष्टी करत होती. ज्यावेळी तिला विचारलं जायचं, त्यावेळी ती आपण स्पोर्टस बॅचमधून असल्याचं सांगत होती. ज्यावेळी स्पोर्टस कोट्याच्या ट्रेनिंगमध्ये तिला प्रश्न विचारले जायचे तेव्हा ती आपण रेग्युलर बॅचमधून असल्याचं सांगायची. तर कधी सापडू नये यासाठी इनडोर क्लास आणि एक्टिविटीला हजर राहणे टाळायची. अॅकॅडमीत निवड झालेल्यांना हॉस्टेल मध्येच राहावं लागायचं. मात्र, मोनाचं नाव निवड यादीत नसल्यामुळे तिला हॉस्टेलमध्ये राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती रोज अकॅडमीमध्ये यायची आणि ट्रेनिंग संपल्यावर निघून जायची.
बाहेर जाण्यासाठी पण तिने अनोखी शक्कल लढवली होती. ती अकॅडमीमध्ये मुख्य गेट मधून येत नव्हती, कारण मुख्य गेटवर ओळखपत्र तपासलं जात होतं. त्यामुळे ती त्या गेटमधून आत यायची जिथून पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रवेश होता. आत आल्यानंतर जास्तीतजास्त वेळ ती कॅन्टीन, स्वीमिंग पूल, फॅमिली कॉर्टर्समध्येच घालवत होती. अकॅडमीच्या कॅन्टीनमध्ये ती पोलीस वर्दीतच जायची आणि नवीन सब इन्स्पेक्टर सोबत मैत्री करायची.
पोलीस अकॅडमीत निवड झालेल्या कॅन्डीडेटनी त्यांच्या वर्दीचा खर्च स्वतःच करावा, असा अकॅडमीचा नियम आहे. मोना ने वर्दी तर स्वतःच शिवून घेतली होती आणि सापडण्याच्या भीतीने सब इंस्पेक्टरला मिळणारा पगारही घेत नव्हती.
Fake Female Sub Inspector
मात्र, ते म्हणतात ना, गुन्हेगार काही ना काही सुराग मागे सोडतोच. मोनाही त्याला अपवाद नव्हती. तर झालं असं की, पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका सब इंस्पेक्टरने एक व्हाट्सअॅप ग्रुप बनवला होता. एके दिवशी मोनाचं या सब इंस्पेक्टरशी भांडण झालं आणि त्याला अकॅडमीतून काढून टाकण्याची धमकी दिली. इथूनच मोनाचं पितळ उघड पडायला सुरुवात झाली. त्या भांडण झालेल्या सब इंस्पेक्टरने तिची संपूर्ण माहिती गोळा करायला सुरुवात केली. मात्र मोनाचं नाव कोणत्याच बॅच मध्ये सापडलं नाही. ना रेग्युलर बॅचमध्ये ना स्पोर्ट्स बॅचमध्ये .
यानंतर सब इन्स्पेक्टर ने मोनाची अकॅडमीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि शेवटी अधिकाऱ्यांना जेव्हा समजलं की मोना फसवणूक करत आहे, त्यावेळी त्यांनी तिची तक्रार शास्त्रीनगर पोलीस स्थानकात केली. तिच्यावर आयपीसी ४१९, ४६८, ४६९, ६६ आणि राजस्थान पोलीस कायदा ६१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेतआ णि तेव्हापासून मोना फरार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.