firhad hakim Resign :  Saam tv
देश विदेश

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; कोलकाताच्या महापौरांचा तडकाफडकी राजीनामा

firhad hakim Resign : ममता बॅनर्जी यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कोलकाताच्या महापौरांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

६० आमदारांनी स्थापन केला वेगळा गट

पक्षफुटीनंतर आता कोलकाताच्या महापौराचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भ्रष्टाचारात अडकलेल्या टीएमसी नेत्यांवर कारवाई होत आहे. टीएमसीच्या अनेक नेत्यांवर लोक हल्ले करताहेत. आतापर्यंत टीएमसीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर आता पक्षातही उभी फूट पडली आहे. टीएमसीच्या ६० आमदारांचा वेगळा गट स्थापन झाला आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या जवळचे नेते फिरदाद हकमी यांनी कोलकाताच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या जवळचे नेते मानले जाणारे फिरहाद हकीम यांनी कोलकाताच्या महौपारपदाचा राजीनामा दिला आहे. टीएमसी नेते कुणाल घोष यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

फिरहाद हकीम हे पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजाचे मोठे नेते मानले जातात. ते २०१८ सालापासून कोलकाताच्या महापौरपदी विराजमान आहे. कोलकाता महापालिका ही २०१० सालापासून तृणमूल काँग्रेसच्या ताब्यात आहे.

फिरहाद हकीम यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना टीएमसी नेते कुणाल घोष यांनी म्हटलं की, कोलकाता महापालिकेचे महापौर फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी परवानगी मागितली होती. आतापर्यंत ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली नव्हती. परंतु हकीम यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर हकीम यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्याने पालिकेच्या अधिकारात कपात केली जात आहे, असा आरोप टीएमसी नेत्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT