Madhya Pradesh Congress News Saam TV
देश विदेश

Breaking News: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला दोन मोठे धक्के; अशोक चव्हाणांनंतर दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

Satish Daud

Madhya Pradesh Congress News

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेणं पसंत केलंय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यापाठोपाठ आता दोन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि माजी खासदार गजेंद्र राजुखेडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच संजय शुक्ला, विशाल पटेल, माजी आमदार अर्जुन पालिया, माजी आमदार अर्जुन पालिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

सुरेश पचौरी यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुरेश पचौरी यांनी भोजपूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते दोन्ही वेळा भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते. (Loksabha Election 2024)

पचौरी यांच्यापाठोपाठ शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काँग्रेसला राम राम ठोकण्याची शक्यता आहे. मंडीदीप, औबेदुल्लागंज, सुलतानपूर, बारीसह जिल्ह्यातील अनेक नेते पचौरी समर्थक आहेत. दुसरीकडे गजेंद्र सिंह राजुखेडी यांनी देखील काँग्रेसचा हाथ सोडला आहे. राजुखेडी हे 1998 ते 2004 पर्यंत खासदार होते.

त्यानंतर 2009 ते 2014 पर्यंत ते खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेतही ते सहभागी झाले नाहीत. दरम्यान, सुरेश पचौरी आणि गजेंद्र राजुखेडी यांच्यापाठोपाठ इंदूर-१ चे माजी आमदार संजय शुक्ला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT