Big blow to BJP ahead of upcoming Lok Sabha elections 2024 pradeep singh vaghela resigns Saamtv
देश विदेश

Political News: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; गुजरातमधील बड्या नेत्याने दिला राजीनामा

Gujarat Political News: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Satish Daud

Gujarat Political News: आगामी लोकसभा 2024 निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. दुसरीकडे सत्ताधारी एनडीए सरकार विजयाची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. अशातच गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

गुजरातमधील भाजपचे नेते प्रदीपसिंह वाघेला यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप कार्यालयाने वाघेला यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी प्रदेश भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.

प्रदीपसिंह वाघेला यांच्याकडे गुजरातमधील भाजपचे दुसरे शक्तीशाली नेते म्हणून बघितलं जात होतं. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी बाकी असताना त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

वाघेला यांनी अचानक राजीनामा दिल्याने भाजपसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, राजीनाम्यावर प्रदीप सिंह वाघेला यांनी काही दिवसांत सर्व काही ठीक होईल, असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, गुजरात भाजप अलीकडे 'महा जन संपर्क अभियान' किंवा जनसंपर्क कार्यक्रम राबवत आहे.

ज्यामध्ये त्यांनी इतर गोष्टींबरोबरच भाजपकडून विविध व्यावसायिक समुदायांच्या परिषदांचे आयोजन करण्यात आलं आहे. या व्यापक प्रचाराचा एक भाग म्हणून विविध व्यापारी समुदायांच्या परिषदा, प्रदेश भाजपच्या विविध सेलचे कार्यक्रम आणि सर्व 26 लोकसभा मतदारसंघात मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT