Gautam Adani News
Gautam Adani News Saam TV
देश विदेश

Gautam Adani : अदानींचे स्वप्न भंगले, हिंडेनबर्गमुळे बसला मोठा धक्का; ३४,९०० कोटींचा प्रकल्प पाण्यात जाणार?

Satish Daud-Patil

Gautam Adani News : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे मोठे नुकसान झाले आहे. समूह कंपन्यांचे शेअर्स सावरत असले, तरी या अहवालाने गौतम अदानी यांच्या स्वप्नांना मागे ढकलले आहे. याप्रकरणात आता अदानी यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली आहे. त्यांनी तब्बल ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मुंद्रा येथे या प्रकल्पाचे काम सुरू होते. अदानी एंटरप्रायझेसने २०२१ मध्ये गुजरातमधील कच्छ येथे अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या जमिनीवर कोळसा ते PVC प्लांट स्थापित करण्यासाठी मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडची स्थापना केली होती. याचे काम अत्यंत जोरात सुरू होते.

परंतु २४ जानेवारीच्या हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर परिस्थिती बदलली. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो, असे हिंडेनबर्गने अहवालात म्हटल्याने अनेक गुंतवणूकदारांनी अदानी समुहामध्ये केलेली गुंतवणूक अचानक काढून घेतली. त्यामुळे अदानी ग्रुपच चांगला अडचणीत आला. त्यांच्या शेअर्समध्ये सुद्धा मोठी पडझड झाली.

इतकंच नाही तर, अदानी यांच्या संपत्तीत सुद्धा मोठी घट झाल्याने ते जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावरून थेट २१ व्या क्रमांकावर घसरले. दरम्यान, हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या या खळबळजनक आरोपीवर अदानी समुहाकडून ४१३ पानांचं उत्तर देण्यात आलं.

अदानी ग्रुपने हिंडनबर्गचे आरोप म्हणजे, भारतावरील हल्ला असल्याचं म्हटलंय. एवढेच नाही, तर २४ जानेवारीला 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तावेज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आल्याचं अदानी ग्रुपने म्हटलं.

मात्र, असं असून सुद्धा अदानी ग्रुपला मोठ्या प्रमाणात फटका बसला. दरम्यान, या फटक्यानंतर अदानी ग्रुपने सावध भूमिका घेतली असून गुजरातच्या कच्छ येथील होणाऱ्या तब्बल ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ज्या प्रकल्पांवर समूहाने काही काळ पुढे न जाण्याचा निर्णय घेतला, त्यात दरवर्षी दहा लाख टन ग्रीन पीव्हीसी प्रकल्पाचाही समावेश आहे. अदानी समुहाच्या वतीने विक्रेते आणि पुरवठादारांना सर्व क्रियाकलाप त्वरित थांबवण्यासाठी मेल पाठवण्यात आहे. ईमेलमध्ये, समूहाने मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडच्या ग्रीन पीव्हीसी प्रकल्पाला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व क्रियाकलाप थांबवण्यास सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT