Rahul Gandhi, Bharat Jodo nyay yatra in assam Latest News  SAAM TV
देश विदेश

Political News : काँग्रेसला आसाममध्ये मोठा धक्का; भारत जोडो न्याय यात्रा निघताच १५० हून अधिक नेत्यांचा भाजप प्रवेश

BJP Vs Congress in Asaam : आसाममध्ये AASU म्हणजेच ऑल आसाम स्टुडेंट्स युनियन आणि काँग्रेसच्या दीडशेहून अधिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

Assam Congress Latest News :

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून निघून जाताच पक्षाला राज्यात मोठा झटका बसला आहे. आसाममध्ये AASU म्हणजेच ऑल आसाम स्टुडेंट्स युनियन आणि काँग्रेसच्या दीडशेहून अधिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या काँग्रेसची यात्रा तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसचे दीडशेहून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. काँग्रेसला त्यांनी उपरोधिक टोला लगावला. राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रेचा आसाममध्ये खूप प्रभाव पडला आहे हे आम्हाला मान्य करावं लागतंय. आसाम काँग्रेस आणि AASU च्या दीडशेहून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगला निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.  (Latest Marathi News)

विशेष म्हणजे, दत्ता या युवक काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्षा होत्या. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा बी व्ही. श्रीनिवास यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. दत्ता यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या, असे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच अशा प्रकारची न्याय यात्रा पाहत आहे. ती ज्या ठिकाणांहून जात आहे, तिथे पक्षाचा पराभव होत आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्यांची विचारधारा सोडून भारतीय जनता पक्षात येत आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT