Police investigate the car where a young couple was found dead after shocking WhatsApp photos surfaced hours before the incident. saam tv
देश विदेश

इंटरनेट सुरू करताच भावाच्या मोबाईलवर धडाधड 40 फोटो अन् 3 व्हिडिओ; कारमध्ये आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह

Bhopal Couple Death Whatsapp Photos Mystery Explained: भोपाळमधील प्रेमी युगलाच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅपवर 40 फोटो आणि 3 व्हिडिओ पाठवण्यात आल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे. एसआयटीकडून सखोल तपास सुरू.

Omkar Sonawane

भोपाळच्या अशोक नगर येथे राहणारे वर्धमान जैन यांनी २४ जून रोजी रात्री ९:४२ वाजता मोबाईलवरील इंटरनेट सुरू करताच त्यांच्या व्हॉट्सॲपवर ४० हून अधिक फोटो आणि तीन व्हिडिओ आपोआप डाउनलोड झाले. या फोटोमध्ये त्यांची चुलत बहीण मुस्कान जैन एका तरुणासोबत दिसत होती. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व मेसेज पाठवणारी व्यक्ती म्हणजे फोटोंमध्ये दिसणारा तोच तरुण रितिक सोनी होता.

आता या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी दिलेल्या वेगवेगळ्या जबाबांमुळे ही केस अधिक गुंतागुंतीची झाली आहे. यानंतर पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून, घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमधूनही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह

बुधवारच्या मध्यरात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास शहरातील ईसागढ रोडवरील महाना गावाजवळ एका कारमध्ये एका मुलाचे आणि मुलीचा मृतदेह आढळला. दोघेही पुढच्या सीटवर होते, प्राथमिक तपासात युवकाच्या डोक्यात गोळी लागल्याचे आढळले. तर युवतीच्या शरीरावर आणि गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खोल जखमा आढळल्या. त्यानंतर एसपी सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्वालियरहून आलेल्या एफएसएल टीमनेही बारकाईने तपास केला.

घटनास्थळी संशयास्पद साहित्य जप्त

पोलिसांना घटनास्थळी पिस्तूल, कुऱ्हाड, सल्फासच्या गोळ्यांचे पाकीट, सुसाइड नोट, तीन मोबाईल फोन आणि एक लाईटर असे अनेक संशयास्पद साहित्य सापडले. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी तातडीने एसडीओपी विवेक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली.

एसआयटीकडून सखोल तपास

या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जाणार असून, त्यात कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी, सायबर सेल अधिकारी, महिला सेल अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसपींनी ४५ दिवसांत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

३-४ वर्षांपासून प्रेमसंबंध

युवक आणि युवतीमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे कारने लाँग ड्राइव्हला गेले होते. मात्र आपापसातील वादातून ही गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत आहे.

दोन्ही कुटुंबांचे वेगवेगळे दावे

या प्रकरणात दोन्ही कुटुंबीयांनी वेगवेगळे दावे केले आहेत. मुलाच्या वडिलांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगत हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर मुलीच्या चुलत भावाने खुलासा केला की, घटनेच्या काही तास आधी मुलाने मुलीच्या भावाला आणि इतर नातेवाईकांना काही आक्षेपार्ह फोटो पाठवले होते, ज्यामुळे ब्लॅकमेलिंगचा संशय निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood sugar: मधुमेही रूग्णांनी या ३ भाज्या जरूर खाव्यात; ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल खून प्रकरण; सिया गोयलच्या भावाची चौकशी होणार

Nashik tourism: पावसाळ्यात वनडे ट्रिप प्लान करताय? नाशिकजवळची ही 4 ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

तीच तीच हेअरस्टाईल नको! वटपौर्णिमेला साडीवर ट्राय करा 'या' 5 हटके हेअरस्टाईल्स

Doctor Resign : सरकारी रुग्णालयातील ५ डॉक्टरांचे एकाचवेळी राजीनामे; गडचिरोलीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT