Haryana : भिवानी- हिसार मार्गावर बस आणि ट्रॉलीमध्ये भीषण अपघात, 4 ठार Saam Tv
देश विदेश

Haryana : भिवानी- हिसार मार्गावर बस आणि ट्रॉलीमध्ये भीषण अपघात, 4 ठार

हरियाणातील भिवानी- हिसार रोडवर गुरुवारी एक भीषण अपघात झाला आहे. जटू लोहारीजवळ बस आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठी टक्कर झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवानी : हरियाणातील भिवानी- हिसार रोडवर गुरुवारी एक भीषण अपघात झाला आहे. जटू लोहारीजवळ बस आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठी टक्कर झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना भिवानी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. तर काही जखमींना हिसार या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

परिसरातील रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या ३ जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. ४ गंभीर जखमींना रोहतक या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी बसमध्ये ५० लोक होते. घटनेची माहिती मिळताच डीसी जयबीर सिंह आर्या आणि एसपी अजितसिंह शेखावत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. डीसी म्हणाले की, जखमींच्या उपचारामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला जाणार नाही.

हे देखील पहा-

नियमांनुसार जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येईल तर, दुसरीकडे एसपी अजित सिंह म्हणाले की, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये असे सांगितले जात आहे की, बस खूप वेगात होती. बस उलटली तेव्हा त्याचे छत उखडले आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी बसखाली दबले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि आसपासच्या लोकांनी जखमींना वाचवण्यासाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच भिवानीहून एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांनी भिवानी या ठिकाणी असलेल्या चौधरी बन्सीलाल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, बस उडाली आणि बसचे दोन भाग झाले आहेत.

बस प्रवाशांसह हांसीसाठी भिवानीला निघाली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वाटेत जटू लुहारी गावाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस ट्रॉलीला धडकली आहे. यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे, तर १२ जखमी आहेत. जखमींना खासगी वाहनांद्वारे रुग्णवाहिकेतून भिवानी या ठिकाणी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे.

यामध्ये डॉक्टरांनी ४ जणांना मृत घोषित केले आहे. तर १२ जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजितसिंह शेखावत आणि उपायुक्त जयबीरसिंह आर्या चौधरी यांनी बन्सीलाल रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचून जखमींची माहिती घेतली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT