Rahul Gandhi Slams PM Modi And BJP Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi: 'BJP-RSS माझे गुरू; त्यांच्यामुळेच मला...' राहुल गांधींच्या वक्तव्याची रंगली चर्चा

दिल्लीमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महागाई, वाढत्या बेरोजगारीवर बोलताना भाजपवर जोरदार टिका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला सध्या देशभरात जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. काश्मिरपासून सुरू झालेली यात्रा सध्या राजधानी दिल्लीमध्ये असून कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी टी- शर्टवर फिरत असल्याच्या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. राहुल गांधीच्या या फोटोनंतर दिल्लीमध्ये झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप आणि आरएसएसबद्दल केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा सध्या दिल्लीमध्ये आहे. यावेळी दिल्लीमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महागाई, वाढत्या बेरोजगारीवर बोलताना भाजपवर जोरदार टिका केली. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला असे सांगताना त्यांनी ही देशवासियांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

आरएसएस - भाजपा माझे गुरू

या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका करताना त्यांनी "आरएसएस भाजपच्या लोकांनी माझ्यावर जोरदार टीका करावी, तेच माझे राजकीय गुरू आहेत, त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करु नये, याबद्दलची शिकवण मिळते," असा खोचक टोला लगावला.

या पत्रकार परिषदेत भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना त्यांनी "ही यात्रा सुरू झाली तेव्हा अगदीच सामान्य होती, मात्र कालातंराने यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. राजकीय मतभेदामुळे अनेक विरोधक यात्रेत सहभागी होत नाहीत, मात्र आमचे विचार एक आहेत, असेही राहुल गांधींनी नमूद केले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी माझ्या बदनामीसाठी भाजपने मोठे कॅंम्पेन चालवले होते," असाही आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT