भारत बायोटेक Twitter/@ANI
देश विदेश

भारत बायोटेक आणि डब्ल्यूएचओची 23 जूनला प्रि-सबमिशन बैठक होणार

गेल्या महिन्यात, भारत बायोटेकने डब्ल्यूएचओच्या आपातकालीन लस वापरासाठी (ईयूएल) आवश्यक असणारी 90 टक्के कागदपत्रे आधीच सादर केल्याची माहिती दिली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जागतिक आरोग्य संघटनेकडून World Health Organization हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या Bharat Biotech कोव्हॅक्सीन Covaxin लसीला आपतकालीन वापरास मंजूरी मिळावी, यासाठी येत्या २३ जून रोजी भारत बायोटेकची प्रि-सबमिशन बैठक आयोजित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन लस वापराच्या लसीच्या यादीत कोव्हॅक्सीन लसीचा समावेश करण्यासाठी लसीच्या मुल्यांकनासाठी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bharat Biotech and WHO will hold a pre-submission meeting on June 23)

दरम्यान, गेल्या महिन्यात, भारत बायोटेकने डब्ल्यूएचओच्या आपातकालीन लस वापरासाठी (ईयूएल) आवश्यक असणारी 90 टक्के कागदपत्रे आधीच सादर केल्याची माहिती दिली होती. उर्वरित कागदपत्रे या महिन्यात सादर करायची आहेत. कोविड-१९ लसीसाठी डब्ल्यूएचओची मान्यता मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय भारत बायोटेकबरोबर समन्वय साधत आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीचा संसर्ग देशभरात पसरल्यानंतर भारतात सध्या उपलब्ध लसींपैकी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस भारतातील नागरिकांना देण्यात येत आहे.

देशात १६ जानेवारी २०२१ पासून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात आघाडीवर काम करणारे म्हणजेच डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी, पोलीस, आदिंना सर्वात पाहिल्यांदा लसीकरण करण्यात आले. त्यानंतर, 1 मार्चपासून 60 वर्षे वयोगटातील आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तर, १ एप्रिलपासून ४५वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. तर १ मे पासून १८-४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली.

Edited By- Anurdha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT