Mundwa Municipality Election 
देश विदेश

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Mundwa Municipality Election : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील मुंडवा नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक असूनही पक्षाच्या अधिकृत उमेदवार गीता देवी यांना एकही मत मिळाले नाही.

Namdeo Kumbhar

Mundwa Municipality chairperson election BJP zero votes : भाजपने पिछाडीवर असतानाही सरकार स्थापन केल्याचा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील अथवा ऐकल्या असतील. राजस्थानमधील अजमेर आणि पालीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तसाच विजय खेचून आणला. पण नागौरमध्ये मात्र भाजपला जोरदार धक्का बसलाय. मुंडवा नगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपला या ठिकाणी अध्यक्ष निवडून आणण्यात अपयश आलेच. पण धक्कादायक म्हणजे, भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अधिकृत उमेदवाराला एकही मत मिळाले नाही.

नागौर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त १० नगरसेवक निवडून आणूनही भाजपला मोठा शॉक बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला शून्य मते मिळाली. पक्षाच्या सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी पक्षाविरुद्ध जाऊन 'क्रॉस व्होटिंग' (बंडखोरी) केल्याचे उघडकीस आले आहे.

नेमका काय खेळ झाला?

मुंडवा नगरपालिकेत एकूण २५ जागा (वॉर्ड) आहेत. बहुमत मिळवण्यासाठी १३ मतांची गरज होती. भाजप १० जागा,

आरएलपी (हनुमान बेनीवाल यांची पार्टी) ७ जागा, काँग्रेस ३ जागा आणि ५ अपक्ष नगरसेवक आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच अध्यक्ष होणार असे मानले जात होते. पक्षाने गीता देवी यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली.

पक्षांतर्गत बंडखोरी

भाजपच्या नगरसेवकांपैकी घनश्याम सदावत हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण पक्षाने त्यांना तिकीट न देता गीता देवी यांना उमेदवारी दिली. यामुळे संतापलेल्या घनश्याम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. अध्यक्षपदासाठी मतदान झाले, त्यावेळी भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या गीता देवी यांना डावलून घनश्याम सदावत यांना मते दिली. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार गीता देवी यांना एकही मत मिळाले नाही.

१ मताने विरोधी आघाडीचा विजय:

काँग्रेस (३ मते) आणि आरएलपी (७ मते) यांनी एकत्र येत अलका देवी कंदोई यांना उमेदवारी दिली. या युतीला अपक्षांचीही मते मिळाली. अलका देवी या १३ मते मिळवत विजयी झाल्या. तर भाजपचे बंडखोर घनश्याम सदावत यांना १२ मते मिळाली. भाजपच्या अधिकृत उमेदवार गीता देवी यांना एकही मत मिळाले नाही.

केवळ १ मताच्या फरकाने काँग्रेस आणि आरएलपीच्या युतीने नगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला, तर सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपला बंडखोरीमुळे सत्ता गमावावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT