Punjab Elections Update भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री - Saam Tv
देश विदेश

Punjab: 'या' तारखेला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; राज्यपालांची घेतली भेट

शुक्रवारी मोहालीमध्ये झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

चंदीगड - पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. भगवंत मान 16 मार्च रोजी दुपारी12.30 वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी मोहालीमध्ये झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

सरकारमध्ये मंत्रीपदासाठी हरपाल सिंग चीमा, अमन अरोड़ा, बलजिंदर कौर, सर्वजीत कौर मनुके, गुरमीत सिंग, मीत हेअर, बुद्ध राम, कुंवर विजय प्रताप सिंग, जीवनज्योत कौर आणि डॉ चरणजीत सिंग यांच्यासह अनेक आप आमदारांची नावे पंजाबमध्ये चर्चेत आहे.

भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. नवांशहर जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.117 सदस्यीय विधानसभेत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT