Saam Tv
देश विदेश

पती-पत्नी अन् बेस्ट फ्रेंड! 'त्या' एका कृत्याने तुटली 13 वर्षांची मैत्री...

मित्र खूप महत्वाचे असतात. पण अलीकडेच एका महिलेच्या बेस्ट फ्रेंडने असे काही केले की आता ती महिला तिच्या बेस्ट फ्रेंडवर नाराज झाली आहे.

वृत्तसंस्था

कोणत्याही व्यक्तीसाठी मैत्री खूप महत्त्वाची असते. त्यातला त्यात बेस्ट फ्रेंड म्हणलं की, ती व्यक्ती म्हणजे जीव की प्राण. बेस्ट फ्रेंड म्हणजे ती व्यक्ती जिला तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी सांगू शकता, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सर्व काही माहित असते. तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीवर मित्र तुम्हाला जज करत नाही. पण, जर तुमचा एखादा जिवलग मित्र/मैत्रीण तुमच्या जोडीदारालाचं प्रेमाच्या नजरेने बघत असेल तर? असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. महिलेच्या जिवलग मैत्रिणीने असे काही केले ज्यामुळे तिला धक्का बसला आणि ती अस्वस्थ झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

संपूर्ण प्रकरण;

महिलेने सांगितले की, माझे आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचे वय 31 वर्षे आहे आणि आम्ही कॉलेज काळापासून एकत्र आहोत. आता आम्ही एकाच फर्ममध्ये एकत्र काम करतो. महिलेने सांगितले की, माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मागील काही काळ खूप कठीण होता.

महिलेने सांगितले की, गेल्या महिन्यातच माझ्या जिवलग मैत्रिणीला कळले की तिचा नवरा तिची फसवणूक करत आहे आणि आता त्याला तिच्याकडून घटस्फोट (Divorce) हवा आहे. माझी मैत्रीण हे ऐकून अस्वस्थ झाली, तिला खूप मोठा धक्का बसला. पण मैत्रीच्या नात्याने, काहीही करून मला तिचे दुःख कमी करायचे होते. मला तिला यातून बाहेर काढायचे होते म्हणून मी तिला ऑफिस पार्टीसाठी आमंत्रित केले. मला वाटले की, असे केल्याने तिचा मूड थोड्या तरी नीट होईल.

हे देखील पाहा-

यानंतर, पार्टीदरम्यान ती माझ्या पतीसोबत डान्स करत होती आणि यावेळी ती खूप आनंदी दिसत होती. पण थोड्या वेळाने मी पाहिले की ती माझ्या नवऱ्याला किस करत आहे. माझ्या नवऱ्याने तिला लगेच दूर ढकलले. पण आता ते दृश्य माझ्या मनातून जात नाही आहे. माझ्या जिवलग मैत्रिणीनेही या कृत्याबद्दल माझी माफी मागितली, पण मी त्याला कधीच तिला माफ करू शकेन असे मला वाटत नाही. ती महिला म्हणाली, मला माझी 13 वर्षांची मैत्री संपवायची नाही, पण माझ्या मैत्रिणीच्या त्या कृत्याचा मला खूप राग येत आहे.

याबद्दल तज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खूप कमी लोक असतील ज्यांची मैत्री इतकी वर्ष जुनी आहे. परंतु हे अगदी खरे आहे की, तुमच्या जिवलग मैत्रिणीने तुमच्या पतीला किस करणे योग्य नव्हते. पण तुमच्या त्या मैत्रिणीने खूप दारू प्यायली होती हेही खरं आहे. या चुकीसाठी तुमची 13 वर्षांची मैत्री संपवणे योग्य होणार नाही. तज्ञ म्हणतात की तुमचा चांगला ती मैत्रीण खूप कठीण काळातून जात आहे. तिने या कृत्याबद्दल तुझी माफी मागितली आहे, मग तू तिला माफ का करत नाहीस ? माफ कर आणि पुढे जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

Agricultural Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो! सब्सिडीवर मिळेल ट्रॅक्टर,रोटाव्हेटर आणि ड्रोन; कसा कराल अर्ज?

Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT