Electrician Kills Wife and Creates Fake Accident Scene Saam Tv
देश विदेश

बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर... नेमकं घडलं काय?

Electrician Kills Wife and Creates Fake Accident Scene: बंगळुरूमध्ये नवऱ्यानं बायकोचा गळा आवळून खून करून विजेचा धक्का लागल्याचे सांगितलं. आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Bhagyashree Kamble

  • बंगळुरूमधील धक्कादायक घटना.

  • पतीनं पत्नीचा गळा आवळला.

  • नंतर शॉक बसला असल्याचं भासवलं.

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यानं बायकोचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर त्यानं वॉटर हीटरमधून विजेचा धक्का बसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तपासात नवऱ्यानेच बायकोचा खून केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी नवऱ्याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

प्रशांत कुमार (वय वर्ष २५) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर, रेश्मा (वय वर्ष ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी इलेक्ट्रिशियन असून बल्लारी जिल्ह्यातील हुविना हडगलीचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माचे आधी सुरेंद्रशी लग्न झाले होते. वर्षभरापूर्वी त्यांचे आजाराने निधन झाले. त्यांना १५ वर्षांची मुलगी आहे.

रेश्माची प्रशांतशी नऊ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. त्यानंतर लवकरच दोघांनी लग्न केलं. प्रशांतला लग्न झाल्यापासून रेश्माच्या चारित्र्यावर संशय होता. तो वारंवार तिच्यासोबत भांडत होता. १५ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेला. जोरदार वाद सुरू असताना प्रशांतने रेश्मावर हल्ला केला. तिचा गळा दाबून खून केला.

हत्येची घटना लपवण्य़ासाठी प्रशांतने रेश्माचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. पाण्याच्या बादलीत हीटर ठेवून चालू केला. नंतर अपघात झाला असल्याचं भासवलं. सायंकाळी मुलगी शाळेतून परतली. तिनं बाथरूमचा दरवाजा उघडला. तेव्हा आई बेशुद्ध अवस्थेत आढळली. स्थानिकांनी तिला रूग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

सुरूवातीला आरोपी प्रशांतने रेश्माचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असल्याचं सांगितलं. परंतु, तपासानंतर आरोपीनं खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

GenZ Search Trends: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT