देश विदेश

Shocking: घटस्फोटित महिलेचा लग्नासाठी हट्ट; ज्याला जीव लावला त्यानेच जीव घेतला

Bengaluru Crime News: बेंगळुरूमध्ये ४० वर्षीय घटस्फोटित महिलेला तिच्या विवाहित प्रियकराने लग्नाचा दबाव आणल्यामुळे चाकूने वार करून ठार केले. अनेक महिन्यांच्या संबंधांनंतर घडलेल्या या घटनानंतर आरोपीला पोलिसांनी पकडले.

Dhanshri Shintre

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू पुन्हा एकदा एका भयानक घटनेमुळे हादरली आहे. के.जी. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिल्लना गार्डन परिसरात एका ४० वर्षीय महिलेची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. परंतु लग्नाचा दबाव आल्याने त्यांच्यात वाद वाढत चालला होता. अखेर रागाच्या भरात आरोपीने तिला चाकूने वार करून ठार मारले.

मृत महिला घटस्फोटित होती आणि घरकाम करून आपला संसार चालवित होती. तिचा आरोपी प्रियकर विवाहित होता आणि त्यांचे अनेक महिन्यांपासून संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. काही काळापासून त्या महिलेकडून लग्नाचा दबाव येत असल्यानं आरोपी संतापला होता. शुक्रवारी महिला कामावरून परत येत असताना आरोपीने तिला बोलण्याच्या बहाण्याने एका जागी नेले. तिथे झालेल्या वादातून आरोपीने तिच्यावर अनेक वेळा चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने महिला घटनास्थळीच कोसळली.

स्थानिकांनी महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. आरोपी गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आणि काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्येत वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक अहवाल दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या हत्येच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की या भागात अशा प्रकारची भयानक घटना पहिल्यांदाच घडली आहे. पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

SCROLL FOR NEXT