Husband Kills Wife then Ends Life samm tv
देश विदेश

बायकोला बेडवरच चाकूने क्रूरपणे संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; नेमकं कारण काय?

Husband Kills Wife Ends Life: बंगळूरूत पतीने पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून घटना घडली असल्याची माहिती. तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • पतीनं पत्नीला संपवलं.

  • नंतर स्वत: गळफास घेतला.

  • नेमकं कारण काय?

बंगळूरूच्या उल्लाल परिसरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवऱ्यानं बायकोची निर्घृण हत्या केली आहे. नंतर स्वत: आयुष्य संपवलं आहे. या दाम्पत्याच्या मृत्यूमागे नेमके कारण काय? अद्याप समोर आले नसून, पोलिसांचा या प्रकरणी शोध सुरू आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नी मंजू (वय वर्ष २७) असं मृत महिलेचं नाव आहे. तर पती घर्मशीलम (वय वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. २०२२ साली त्यांचा विवाह झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजू ही बंगळूरूमधील एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. तर, धर्मशीलम हे नुकतेच दुबईहून परतले होते. हे जोडपं मंजूचे वडील पेरियास्वामी यांच्यासोबत उल्लाल मेन रोडवरील एका भाड्याच्या घरात राहत होते.

मंजूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या आसपास दोघांचे मृतदेह आढळले. मंजूचा मृतदेह पलंगावर पडलेला होता. तिच्या शरीरावर चाकूने वार केले होते. तर, धर्मशीलम याचा मृतदेह नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. यानंतर मंजूच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मंजूच्या वडिलांनी ज्ञानभरती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी हत्या तसेच आत्महत्या, दोन्ही गुन्हे दाखल केले. दोघांमध्ये कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांवरून वाद झाला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Water Shortage : कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट, १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेस वंचितच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, जागा वाटपही ठरलं

Sunidhi Chauhan: हे काय होतं..? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानच्या डान्स मूव्ह्स बघून नेटकरी थक्क, म्हणाले...

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ, दिग्गजांना जमलं नाही ते सपकाळांनी करून दाखवलं

SCROLL FOR NEXT