Bharat Jodo Yatra Latest News Twitter/@INCIndia
देश विदेश

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असताना मोठा धक्का; बेंगळूरु उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

Bharat Jodo Yatra Latest News: कॉंंग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र, याआधीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Congress Bharat Jodo Yatra Todays News: राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली कॉंंग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र, याआधीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे. बेंगळूरू उच्च न्यायालयाने कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. बेंगळूरू उच्च न्यायालयाने कॉंग्रेस आणि भारत जोडो यात्रा यांचे दोन्हीही ट्वीटर (Twitter) हॅण्डेल्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेसचं ट्वीटर अकाऊंट आणि भारत जोडो यात्रेचं ट्वीटर अकाऊंट ब्लॉक केलं जाण्याची शक्यत आहे. (Bharat Jodo Yatra Congress Twitter Handle Block)

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसविरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. केजीएफ चित्रपटाच्या निर्मात्यांनी आरोप केला होता की, काँग्रेसने भारत जोडो यात्रेसाठी तयार केलेल्या मार्केटिंग व्हिडिओंमध्ये त्यांच्या चित्रपटातील गाणी वापरण्यात आली आहेत. आता न्यायालयानेही त्या प्रकरणी आपले आदेश दिले आहेत. त्यात काही किरकोळ बदलांसह मूळ व्हिडिओ एडिट करुन वापरण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने सीडीच्या माध्यमातून सिद्ध केल्याचे म्हटले आहे.

असे मार्केटिंग व्हिडिओ पायरसीला प्रोत्साहन देतात असे कोर्टाने म्हटले आहे. या कारणास्तव, आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, ज्या व्हिडिओंमध्ये ही गाणी वापरली गेली आहेत ते काँग्रेस पक्षांच्या आणि भारत जोडो यात्रा या दोन्ही ट्विटर हँडलवरून हटवण्यात यावेत. त्याचबरोबर दोघांचे ट्विटर हँडलही ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या प्रचारासाठी एमआरटी म्युझिकच्या गाण्यांचा वापर केला आहे. एमआरटी म्युझिककडे कन्नड, हिंदी, तेलुगु आणि तमिळ इत्यादी 20,000 हून अधिक ट्रॅक्सच्या संगीताचे हक्क आहेत. कंपनीने KGF 2 च्या संगीत हक्कांचे अधिकार मिळवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवली आहे. एमआरटी म्युझिकचा आरोप आहे की, काँग्रेसने त्यांच्या संगीताचा वापर राजकीय कार्यक्रमांसाठी न विचारता केला. राहुल गांधी देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ज्यात त्यांनी KGF 2 मधील गाणे वापरले आहे. त्यामुळे कोर्टाने काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रा या दोन्ही ट्विटर हँडलवरून हे सर्व व्हिडिओ हटवण्याे आदेश दिले आहेत, त्याचबरोबर दोघांचे ट्विटर हँडलही ब्लॉक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

SCROLL FOR NEXT