karnatak police 
देश विदेश

Belgaon News : बेळगावात कर्नाटक पोलिसांची मुजोरी, ठाकरेंच्या शिवसैनिकांना रोखलं, अटक केली

Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावच्या सीमेवर तणावाचे वातवरण निर्माण झालेय. कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिंका ताब्यात घेतलेय. शिवसैनिक बेळगावमध्ये महामेळावा घेण्यावर ठाम आहेत.

Namdeo Kumbhar

Belgaon News : कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महामेळावा दडपण्याचा प्रयत्न बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांकडून झाला. मराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना बेळगाव सीमेवरच अडवले. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. बेळगावच्या सीमेवर मराठी माणसांना अडवण्यात आलेय. पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. बेळगाव सीमेवर तणाव होता.

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलाय. बेळगाव इथे आयोजित केलेल्या महामेळाव्याला कोल्हापुरातून शिवसेनेचे नेते जाऊ नये यासाठी कर्नाटक पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आलाय. बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.

बेळगाव जिल्ह्यात कोल्हापुरातील चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. कर्नाटक पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही बेळगाव मध्ये जाणार, असा पवित्र शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी घेतला आहे.

कर्नाटक पोलिसांची पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर दडपशाही केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेय. या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे बेळगाव सीमा भागामध्ये तणावाचं वातावरण आहे.

शिवसेनेच्या (उबाठा) वतीने काढण्यात आलेल्या भगव्या रॅलीला सकाळी सुरूवात झाली. कोल्हापुरातील ताराराणी चौकातून कोल्हापूर ते बेळगाव भगव्या रॅलीला सुरुवात झाली. बेळगाव इथे होत असलेल्या महामेळाव्यासाठी शिवसैनिक कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील कोगनोळी टोल नाका इथं कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

Google Doodle Equation: गुगल डुडलवर आज गणिताची समीकरणं; जाणून घ्या काय आहे भन्नाट प्रकार

SCROLL FOR NEXT