Water Bottle
Water Bottle Saam Tv
देश विदेश

Water Bottle: तुम्हीही सीलबंद बाटलीतलं पाणी पित असाल तर, सावधान! बाटलीत टॉयलेट सीटपेक्षाही 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया

संजय जाधव

Low Quality Water : तुम्ही जर दुकानातून विकत घेतलेली पाण्याची बाटली पुन्हा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असल्याचा धक्कादायक खुलासा एका अभ्यासातून पुढं आलाय. या अभ्यासानुसार, पुन्हा वापरता येणाऱ्या पाण्याच्या बाटलीमध्ये लाखो बॅक्टेरिया असू शकतात. (Latest Marathi News)

कारण आपण अनेकदा दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो आणि महिनोनमहिने त्यातून पाणी पितो. अनेकदा आपण ही बाटली फक्त पाण्याने धुवून पुन्हा वापरतो. त्यामुळं तुम्ही देखील असे करत असाल तर सावधान व्हा.

अमेरिकेतील (America) वॉटर फिल्टर गुरु या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटलीमध्ये टॉयलेट सीटपेक्षा सुमारे ४०,००० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात, असा धक्कादायक खुलासा झाला आहे.

या बाटलीला आता पोर्टेबल बॅक्टेरिया हाऊस म्हणून ओखळले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बाटलीत इतके धोकादायक बॅक्टेरिया आहेत की, जे तुमच्यामध्ये अशाप्रकारची क्षमता निर्माण करता ज्यामुळे शरीरावर औषधांचाही कोणताही परिणाम होणार नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्हाला एखादी दुखापत किंवा रोग झाला तर तो बरा करण्यासाठी तुम्ही औषधांचा वापर केला तरी त्या औषधांचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच तुमची दुखापत, रोग बरा होणार नाही. तसेच यातील अनेक बॅक्टेरियामुळे आतड्यांसंबंधीत आजार होऊ शकतात.

घरगुती पद्धतीने बाटली धुतल्यानंतरही त्याचत किचन सिंकच्या तुलनेत दुप्पट बॅक्टेरिया राहतात. त्यामुळे बाहेरून विकत घेत असलेली ही पाण्याची बाटली अनेक आजारांचे कारण बनू शकते. त्यामुळे पुन्हा वापरण्या योग्य पाण्याची बाटली आठवड्यातून एकदातरी गरम पाणी आणि साबणाने धुवावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: धाराशिव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर अजूनही मतदान सुरूच

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT