Manasvi Choudhary
ऑफिसमध्ये सतत बैठी काम केल्याने अनेकांच्या पोटाच घेर वाढला आहे यामुळे वजन वाढीच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
यावर उपाय म्हणून अनेकजण जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात मात्र यासाठी पैसेही अधिक जातात आणि फरकही दिसत नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला घरी करता येतील असे 5 सोपे व्यायाम सांगणार आहोत.
सूर्य नमस्कार यामध्ये तुम्ही १२ योगासने करा. घरीच नियमितपणे रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने शरीराची हालचाल होते. यामुळे वजन देखील वेगाने घटते.
पोटावरचा घेर वाढला असेल तर तुम्ही घरच्या घरी फलकासन हा योगा करा. यामध्ये संपूर्ण शरीराचे वजन हे पायांवर येते यामुळे पोट आणि पाय यातील वाढलेली चरबी कमी होते.
त्रिकोणासन या योगासनामध्ये कंबर, मांड्या आणि पोटाचा व्यायाम होतो. कंबर, मांड्या आणि पोटावर साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
नौकासन करताना संपूर्ण शरीराचा ताण पोटावर येतो. ज्यामुळे पोटाचा घेर कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.
भुजंगासन हा योगा झोपून करा यामध्ये शरीराचा पुढचा भाग वर उचलावा लागतो. हा योगा केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो.