केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Manasvi Choudhary

केस गळण्याची समस्या

केस गळण्याची समस्या ही आजकाल सर्वानाच भिडसावत आहे. केस गळणं सुरू झालं की मनात नको ते नको विचार यायला सुरूवात होते.

Hair Fall Causes

हे प्रश्न संभ्रम वाढवतात

सतत केस गळती सुरू असेल तर आणि जेव्हा कोणताच उपाय लागू पडत नाही, तेव्हा 'हे कॅन्सरचे लक्षण तर नाही ना?' असे प्रश्न मनात घर करतात.

Cancer Myths

आरोग्यतज्ज्ञांनी दिली माहिती

परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्या मते केस गळतीचा आणि कॅन्सरचा कोणताही संबंध नाही. आरोग्य तज्ज्ञांनुसार, केस गळत असतील तर कॅन्सर समजणे चुकीचे आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार केस गळण्यामागची कारणे वेगवेगळी असतात. याचा कॅन्सरशी कोणताही संबंध नाही.

Hair Fall Causes

ही आहोत केसगळतीची मुख्य कारणे

कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, आर्थिक चिंता, मानसिक त्रास ही केस गळतीची मुख्य कारणे असू शकतात. सतत तणावात असाल तर हे केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते यामुळे केस कमकुवत होतात आणि गळतात.

Hair Fall Myths

महिलांमध्ये केस गळण्याचे प्रमाण अधिक का?

महिलांमध्ये हार्मोन्सच्या बदलामुळे, PCOD या समस्येमुळे तसेच गर्भधारणेनंतर केस गळण्याची समस्या उद्भवते. केमिकलयुक्त प्रसादने वापरल्याने, वाढत्या प्रदूषणामुळे, केसांच्या अस्वच्छतेमुळे देखील केस गळतात.

Hair Fall | google

कॅन्सर आणि केसांचा संबंध काय?

मग कॅन्सर आणि केसांचा संबंध काय? तर कॅन्समुळे थेट केस गळतात असे नाही. कॅन्सरवर उपचारदरम्यान वापरल्या जाणाऱ्या केमोथेरपी औषधांच्या परिणामामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि केस गळतात किंवा केस काढतात.

Cancer Facts

केमोथेरपी ट्रिटमेंट

केमोथेरपी ही ट्रिटमेंट शरीरातील वेगाने वाढणाऱ्या पेशींवर परिणाम करते यामध्ये केसांच्या मुळांतील पेशींचाही समावेश असतो म्हणून केस गळतात.

Chemotherapy Side Effects

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ल घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

येथे क्लिक करा...