गुवाहाटी : आसामच्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठं बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवरती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे राजकीय गुरु आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आसाममध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आव्हान देणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या चर्चा राज्यासह देशभर सुरु होत्या. एवढच नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील एकनाथ शिंदे हे नाव ट्रेंडला होते. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारला आणि शिवसेनेला आव्हान देणारा हा नेता कोण आहे याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
हे देखील पाहा -
आसाममध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरती 'हिंदुत्व फॉरएव्हर' (Hindutva Forever) असा हॅशटॅग देण्यात आला आ. तसंच, 'गर्व से कहो हम हिंदू है, एकनाथ शिंदे आप आगे बढो' असा मजकूर यावर लिहण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील ज्या हॉटेल 'रेडिसन ब्लू' मध्ये थांबले आहेत त्या हॉटेलपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे बॅनर लावण्यात आलं आहे.
दरम्यान, आज शिंदे यांच्या बंडाला आज एक आठवडा उलटून गेला आहे. शिवाय आजच शिंदे गडातील बंडखोर आमदारांवरती सुप्रीम कोर्टाने कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांसह शिंदे समर्थकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता महाराष्ट्रानंतर शिंदे समर्थकांनी आसाममध्ये देखील त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने आता शिंदेंच्या चर्चा आसाममध्ये देखील सुरु झाल्या आहेत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.