Latest update for Bank Employees Saam TV
देश विदेश

Bank Employees News: बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ, फक्त ५ दिवस करायचं काम; करारावर अंतिम स्वाक्षऱ्या

Bank Employees Got Salary Hike: या करारामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका यासह १० खाजगी बँका आणि 3 विदेशी बँकांचा समावेश आहे. अशा एकूण १५ बँकांमधीव ७ लाख बँक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Ruchika Jadhav

5 Days Working For Bank Employees:

बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) १७ टक्के वाढ करण्याच्या करारावर ८ मार्च रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी अंतिम स्वाक्षऱ्या केल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून हा करार रखडलेला होता. अशात काल यावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यात.

१७ टक्के पगारवाढ

या करारामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांयासह १० खाजगी बँका आणि 3 विदेशी बँकांचा समावेश आहे. अशा एकूण १५ बँकांमधील ७ लाख बँक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पगारवाढीसह यामध्ये ५ दिवसांचा आठवडा करण्यावर देखील चर्चा झालीये.

५ दिवसांचा आठवडा

सदर करारामुळे जवळपास 7 कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ होणार आहे. बँक कर्मचारी (Bank Employee) अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी या करारात ५ दिवसांच्या आठवड्याची देखील मागणी केली होती. या मागणीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी होती. ही सुट्टी आता सर्व आठवड्यांना मिळार आहे.

सदर करार निर्णय सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. यावर पुढील सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार आहे. सुट्ट्या आणि पगारवाढीबाबत बँकिंग संघटनांची आयबीएशी दीर्घकाळ चर्चा सुरू होती. बरेच दिवस चर्चा केल्यानंतर शुक्रवारी या मागण्या मान्य करत त्यावर सामंजस्य करार करण्यात आलाय.

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे बँकांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी १२ हजार ४४९ कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. सदर करार हा ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू असेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विचार देखील या करारात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT