Bangladesh Violence:  Saamtv
देश विदेश

Who Is Nahid Islam: कॉलेजच्या पोराने सत्ता हालवली! थेट पंतप्रधानांनी खुर्ची सोडली; शेख हसीनांचे साम्राज्य संपवणारा नाहिद इस्लाम कोण?

Bangladesh Violence: बांगलादेशमधील सत्ता पालटण्यात, शेख हसीना यांना देशातून पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या प्रमुख विद्यार्थी नेत्याचे नाव आहे नाहिद इस्लाम. नाहिद इस्लाम हा ढाका विद्यापीठातील समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे

Gangappa Pujari

Sheikh Hasina Resignation as PM of Bangladesh: बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनाने इतके उग्ररुप धारण केले की पंतप्रधान शेख हसिना यांना पदाचा राजीनामा देत देश सोडून पलायन करावे लागले. बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व नाहिद इस्लाम याने केले. कोण आहे नाहिद इस्लाम? ज्याने शेख हसिना यांच्या राजवटीला धक्का दिला, वाचा सविस्तर...

कोण आहे नाहिद इस्लाम?

बांगलादेशमधील सत्ता पालटण्यात, शेख हसीना यांना देशातून पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या प्रमुख विद्यार्थी नेत्याचे नाव आहे नाहिद इस्लाम. नाहिद इस्लाम हा ढाका विद्यापीठातील समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी नेत्यासह मानवाधिकार कार्यकर्ता तसेच 'स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन'चे ते समन्वयकही आहेत. नाहिद हा त्या आरक्षणविरोधी चळवळीचा मोठा चेहरा आहे ज्याने पंतप्रधानांना पायउतार होण्यास भाग पाडले.

विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा!

नाहिद इस्लामने पोलिसांनी 20 जुलै रोजी सकाळी ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. तो २४ तास बेपत्ता होता. मात्र नंतर तो एका पुलाखाली बेशुद्धावस्थेत सापडला. तो बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. याआधी पोलिसांनी नाहिदचे साथीदार आसिफ मेहमूद आणि अबू बकर यांनाही ताब्यात घेऊन बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी याचा स्पष्ट नकार दिला होता. तसेच त्याच्या सुरक्षेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला. दरम्यान, त्यांच्याकडून आंदोलन संपवण्याचे व्हिडिओही पोलिसांना मिळाले आहेत.

शेख हसीना यांनी पद सोडले!

नाहिद इस्लाम यांनी रविवारी एक भाषण केले होते ज्यात त्यांनी अवामी लीगचे कार्यकर्ते आणि नेत्यांना दहशतवादी म्हटले होते. ते रस्त्यावर तैनात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अवामी लीगला देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करायची आहे. आमचे ध्येय फक्त विजय आहे. या भाषणानंतरच हे आंदोलन आणखी तीव्र झाले, ज्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि देश सोडावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT